News Flash

२०१२ नवव्या क्रमांकाचे तापट वर्ष

सरलेल्या २०१२ या वर्षांत सरासरी तापमान १४.६ अंश सेल्सिअस इतके होते आणि १८८० पासून कोणत्याही वर्षांपेक्षा तापमानाच्या बाबतीत २०१२ चा नववा क्रमांक लागतो, असे ‘नासा’च्या

| January 17, 2013 05:37 am

जागतिक तापमानाच्या पाहणीनंतर ‘नासा’च्या शास्त्रज्ञांचे मत
सरलेल्या २०१२ या वर्षांत सरासरी तापमान १४.६ अंश सेल्सिअस इतके होते आणि १८८० पासून कोणत्याही वर्षांपेक्षा तापमानाच्या बाबतीत २०१२ चा नववा क्रमांक लागतो, असे ‘नासा’च्या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
सन १८८० पासून आतापर्यंत १९९८ चा अपवाद वगळल्यास २०००, २००५ आणि २०१० आणि २०१२ या वर्षांमध्ये उष्णतेची पातळी सर्वाधिक होती. न्यूयॉर्कमधील ‘नासा’च्या गोडार्ड या अंतराळ अभ्यास संस्थेने जागतिक तापमानाचा आढावा घेतला आणि मंगळवारी त्याची माहिती दिली.
अनेक दशकांपूर्वीपेक्षा पृथ्वीवर उष्ण तापमान कसे कायम राहिले त्याची तुलना करण्यात आली आहे. सरलेल्या २०१२ वर्षांत सरासरी तापमान १४.६ अंश     सेल्सिअस इतके होते आणि ते २० व्या शतकाच्या मध्यात ०.६ सेल्सिअसने जास्त होते. सरासरी वैश्विक तापमान १८८० पासून ०.८ अंश सेल्सिअसने वाढले आहे, असेही अभ्यासात आढळले आहे.
हवामानाच्या पद्धतीत होणारे बदल तापमानातील सरासरी चढउताराला कारणीभूत असतात. मात्र पृथ्वीवरील हरित वायूच्या उत्सर्जनामुळे वैश्विक तापमानात दीर्घकालीन वाढ होण्यास मदत होते, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
प्रत्येक वर्षी गेल्या वर्षीपेक्षा उष्णतेचे प्रमाण जास्त असेलच असे नाही, मात्र हरित वायूच्या उत्सर्जनामुळे प्रत्येक नवे दशक हे गेल्या दशकापेक्षा अधिक उबदार असेल, असेही शास्त्रज्ञांनी म्हटले आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2013 5:37 am

Web Title: 2012 is the 9th rank hotest year
टॅग : Nasa
Next Stories
1 दहशतवादाला राष्ट्रीय धोरण मानणारे देश अल्पदृष्टी : भारताची ठोस भूमिका
2 ‘त्या’ जवानांनी पाक हद्दीत घुसखोरी केल्याचा आरोप धुडकावला
3 अर्धशिशीमुळे महिलांमध्ये हृदयविकाराची वाढती शक्यता
Just Now!
X