देशभरातल्या ३२५ जिल्ह्यांमध्ये करोनाचा शिरकाव झालेला नाही अशी माहिती केंद्राच्या आरोग्य विभागाने दिली आहे. देशाच्या दृष्टीने ही महत्त्वाची बाब आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. काही वेळापूर्वी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३ मेपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेशी आमची चर्चा झाली असंही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं.

देशात १७० जिल्हे हॉटस्पॉट आहेत. तिथे करोनाचा प्रादु्र्भाव रोखण्यासाठी जे जे आवश्यक प्रयत्न आहेत ते करण्यात येत आहेत. लॉकडाउनचा वाढलेल्या वेळ हा आम्हाला उपाय योजना करण्यासाठी महत्त्वाचा ठरतो आहे असंही अग्रवाल यांनी म्हटलं आहे.आत्तापर्यंत देशभरात २ लाख ९० हजार ४०१ लोकांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. अशीही माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली.