अंदाधुंद गोळीबारात ५३ जखमी; ९/११नंतरचा मोठा नरसंहार

अमेरिकेवरील दहशतवादी हल्ल्याच्या कटू स्मृती विस्मरणात जात असतानाच रविवारी अमेरिका पुन्हा एकदा  दहशतवादी हल्ल्याने हादरली. फ्लोरिडा राज्यातील ओरलँडो येथे एका आयसिससमर्थक तरुणाने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ५० जण ठार, तर ५३ जण जखमी झाले. ‘११ सप्टेंबर’च्या दहशतवादी हल्ल्यानंतरचा हा सर्वात मोठा नरसंहार असल्याचे मानले जात आहे. अध्यक्ष बराक ओबामा यांनीही हा दहशतवादी हल्लाच असल्याचे सांगत या कटूप्रसंगी संपूर्ण अमेरिका ओरलँडोवासीयांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याची ग्वाही दिली. या घटनेनंतर व्हाइट हाऊसवरील अमेरिकी राष्ट्रध्वज अध्र्यावर उतरविण्यात आला आहे.

israeli strikes on rafah kill 18 as gaza death toll tops 34000
इस्रायलच्या राफावरील हल्ल्यात १८  ठार
australia church stabbing
ऑस्ट्रेलियामध्ये पुन्हा एकदा चाकूहल्ला; यावेळी चर्चमध्ये प्रार्थना सुरू असताना माथेफिरूचा हल्ला
iran attack israel
जग पुन्हा युद्धाच्या छायेत; इराण पुढच्या ४८ तासांत इस्रायलवर हल्ला करणार, भारताने नागरिकांना दिला इशारा…
israeli air strike destroys iranian consulate in syria
सिरीयातील इराणच्या दूतावासावर इस्रायलचा हवाई हल्ला; किमान ६ ठार झाल्याचा युद्धविरोधी संस्थेचा दावा

फ्लोरिडा राज्यातील ओरलँडो येथे पल्स नाइटक्लब आहे. या नाइटक्लबमध्ये रविवारी एक माथेफिरू तरुण अचानक घुसला. त्याच्या हातात अत्याधुनिक रायफल होती. त्याने क्लबमध्ये केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ५० जण ठार तर ५३ जण जखमी झाले. रविवारी पहाटे दोनच्या सुमारास ही घटना घडली. हल्ल्यानंतर क्लबमध्ये एकच हलकल्लोळ उडाला. हल्ल्याचे वृत्त समजताच स्थानिक पोलिसांनी क्लबला वेढा घालून हल्लेखोराला शरण येण्यास बजावले. प्रथमत हा ओलिस ठेवण्याचा प्रकार असावा, असा पोलिसांचा अंदाज होता. मात्र, हल्लेखोराने पोलिसांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत गोळीबार सुरूच ठेवला. अखेरीस पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हल्लेखोर ठार झाला.

९/११ नंतरचा सर्वात मोठा हल्ला

फ्लोरिडातील या घटनेच्या वृत्तानेच अमेरिकीन नागरिकांची रविवारची सकाळ उजाडली. संपूर्ण अमेरिकेत या घटनेचे पडसाद उमटले असून ‘९/११’नंतरचा हा सर्वात मोठा नरसंहार असल्याचे वर्णन या घटनेचे केले जात आहे. या हल्ल्याचा तपास एफबीआयकडे सोपवण्यात आला असून सर्व शक्यता पडताळून पाहिल्यानंतरच हल्ल्याचे खरे कारण समजू शकणार असल्याचे एफबीआयने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, मतीनचे वडील मीर सिद्दिकी यांनी मात्र ओमर हा दहशतवादी संघटनांशी संबंधित नसल्याचे सांगताना समलिंगींविरोधात त्याच्या मनात असलेल्या द्वेषातूनच त्याने हे कृत्य केले असावे, असा दावा केला आहे. या घटनेचा आणि धर्माचा अर्थाअर्थी काहीही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हल्लेखोर आयसिस समर्थक

हल्लेखोराचे नाव ओमर सिद्दिकी मतीन असे असून तो आयसिस या दहशतवादी संघटनेचा समर्थक असल्याचे समजते. मतीनने हल्ला करण्यापूर्वी ‘९११’ या अमेरिकेच्या राष्ट्रीय आपत्कालीन क्रमांकावर दूरध्वनी करून आपला आयसिसशी संबंध असल्याचे सांगितले होते.

ओरलँडो येथील घटना म्हणजे अमेरिकेवर केलेला हल्लाच आहे. हल्लेखोराने केलेले कृत्य द्वेषमूलक आणि दहशतवादी आहे. संपूर्ण अमेरिका या क्षणी ओरलँडोवासीयांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.

– बराक ओबामा, अध्यक्ष, अमेरिका