News Flash

गुजरातेत चार वर्षांमध्ये ८९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

गुजरातमध्ये गेल्या चार वर्षांत ८९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून, त्यांच्या आत्महत्येचे कारण हे पिकांची हानी हे नव्हते तर त्यामागे इतर कारणे होती,

| March 5, 2015 12:02 pm

गुजरातमध्ये गेल्या चार वर्षांत ८९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून, त्यांच्या आत्महत्येचे कारण हे पिकांची हानी हे नव्हते तर त्यामागे इतर कारणे होती, असे गुजरातच्या कृषी खात्याने म्हटले आहे.
कृषिमंत्री बाबू बोखिरिया यांनी विधानसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात म्हटले आहे, की एकूण ८९ शेतकऱ्यांनी २०१० ते ३१ जुलै २०१४ या काळात आत्महत्या केल्या असून, त्याचा पिकांशी काही संबंध नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे वर्गीकरण पिकांची हानी, कर्जबाजारीपणा व इतर कारणे यात करण्यात आले आहे. किमान ७८ शेतकऱ्यांनी इतर कारणास्तव आत्महत्या केल्या असून, आठ शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे तर तीन शेतकऱ्यांनी कृषी कर्ज वाढल्याने आत्महत्या केल्या.
पिकांच्या हानीमुळे कुणीही आत्महत्या केली नाही असे काँग्रेस आमदार तेजश्री पटेल यांच्या प्रश्नावर सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2015 12:02 pm

Web Title: 89 farmers suicides in gujarat during last four years
Next Stories
1 कराचीत शियापंथीय वकिलाची गोळ्या घालून हत्या
2 बंदी नंतरही ‘त्या’ माहितीपटाचे बीबीसीकडून प्रसारण
3 वादग्रस्त मुलाखत प्रसारित केल्याने बीबीसीला केंद्राची नोटीस
Just Now!
X