11 August 2020

News Flash

९ कबड्डीपटूंचा अपघातात मृत्यू

ओडिशातील सुंदरगड जिल्ह्यातील बराई परिसरात झालेल्या एका अपघातामध्ये नऊ कबड्डीपटू ठार झाले असून, पाचजण गंभीर जखमी असल्याचे वृत्त आहे.

ओडिशातील सुंदरगड जिल्ह्यातील बराई परिसरात झालेल्या एका अपघातामध्ये नऊ कबड्डीपटू ठार झाले असून, पाचजण गंभीर जखमी असल्याचे वृत्त आहे.
सुंदरगड जिल्ह्यातील सुरापल्ली गावाजवळ ही दुर्घटना घडली.  काल रात्री कबड्डीचा संघ मिनीबसमधून सेंधापूरहून धुदीगाव येथे स्पर्धेसाठी जात होता. त्याचवेळी मिनीबस पुलावरून कोसळल्याने सदर दुर्घटना घडली आणि त्यात नऊ कबड्डीपटूंना आपले प्राण गमवावे लागले. या अपघातात पाचजण जखमी झाले असून त्यांना लहुनीपारामधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये अभिराम कालो, धरनीधर नायक, चंद्रशेखर प्रधान, उमेश किसन, गौरी चंद्र किसन यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त करत, मृतांच्या नातेवाईकांना एक लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2015 11:57 am

Web Title: 9 kabaddi players from odisha killed in road accident
Next Stories
1 सुटा-बुटातील लोकांसाठी मोदींचे काम!
2 गोदा भेटली कृष्णेला! गोदावरीचे पाणी कृष्णेमध्ये सोडण्यात आले
3 नेताजींची कागदपत्रे खुली करताना आंतरराष्ट्रीय संबंधांचा विचार व्हावा!
Just Now!
X