25 September 2020

News Flash

Lok Sabha 2019 : मिठाईच्या माध्यमातून मतदानासाठी जनजागृती; हलवाईची अनोखी शक्कल

लोकांनी योग्य उमेदवाराला जास्तीत जास्त मतदान करावे यासाठी माझा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हावडा : मिठाईच्या माध्यमातून मतदानासाठी एका मिठाईवाल्याने जनजागृती केली आहे.

देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीचा फिवर सरु आहे. दरम्यान, नागरिकांमध्ये मतदानासाठी जागरुकता निर्माण व्हावी यासाठी पश्चिम बंगालमधील एका हलवायाने अनोखी शक्कल लढवली आहे. या आपल्या शक्कलीमुळे त्याला चांगला आर्थिक फायदाही होत आहे.


हावडा येथील एका मिठाईच्या दुकानाचे मालक प्रदीप हलदर यांनी ही शक्कल लढवली आहे. आपल्या दुकानात विविध प्रकारच्या मिठायांवर विविध राजकीय पक्षांची चिन्हे त्यांनी साकारली आहे. लोकांनी योग्य उमेदवाराला जास्तीत जास्त मतदान करावे यासाठी माझा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रयत्नामुळे मला चांगला आर्थिक फायदाही होत असल्याचे त्यांनी सांगितले, लोकांनाही ही शक्कल आवडली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे. सात टप्प्यांमध्ये या निवडणुका होणार आहेत. यातील पहिल्या टप्प्यातील मतदान ११ एप्रिल रोजी होणार आहे. सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान १९ मे रोजी होणार आहे. त्यानंतर २३ मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत. निवडणुकीच्या घोषणेबरोबरच देशात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2019 5:49 pm

Web Title: a confectionery creating awareness about voting through sweets
Next Stories
1 लोकसभा निवडणूक: महाआघाडीचं जागावाटप जाहीर, आरजेडीला 20 जागा; काँग्रेस नऊ जागांवर समाधानी
2 फुटिरतावादी नेत्यांना निमंत्रण; पाकिस्तान दिनाच्या कार्यक्रमावर भारताकडून बहिष्कार
3 भाजपा नेत्यांना 1800 कोटींचं लक्ष्मीदर्शन, येडियुरप्पा यांनी फेटाळला काँग्रेसचा आरोप
Just Now!
X