प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी दिल्लीला निघालेल्या तरुणीवार बलात्कार झाल्यी घटना समोर आली आहे. प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी १५ वर्षीय तरुणी दिल्लीला चालली होती. मात्र चुकून ती अमृतसरला पोहोचली होती. तिथे रिक्षाचालक आणि त्याच्या सहकाऱ्याने तिच्यावर बलात्कार केला. एका हॉटेलमध्ये हा बलात्कार करण्यात आला. बलात्कार केल्यानंतर आरोपींनी तरुणीला लुधियानाला जाणाऱ्या बसमध्ये बसवलं आणि घटनेबद्दल कुठेही वाच्यता न करण्याची धमकी दिली.
पीडित तरुणीने लुधियानाला पोहोचल्यानंतर आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. साहिब सिंह आणि बाबा अशी आरोपींची नावे आहेत. पीडित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, एक वर्षापूर्वी लुधियानामध्ये एका नातेवाईकाकडे आली असता आपली आणि प्रियकराची भेट झाली होती. यानंतर आमच्या दोघांमध्ये मैत्री झाली.
मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. प्रियकराने ३ फेब्रुवारीला दिल्लीत लग्न करु असं सांगत तिला बोलावून घेतलं होतं. यासाठी तरुणीने घरातून दीड हजार रुपये चोरी करत ३ फेब्रुवारीला लुधियाना रेल्वे स्थानकावरुन बस पकडली. मात्र ट्रेन दिल्लीला न जाता फिरोजपूरला गेली.
तरुणीने फिरोजपूरमध्ये एका घरात रात्र घालवली. तेथील एका चांगल्या व्यक्तीने तिला घरात आसरा दिला होता. यानंतर तिने फिरोजपूरमधून ट्रेन पकडली जी तिला अमृतसरला घेऊन गेली. तरुणीने तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, अमृतसर रेल्वे स्थानकावर तिने रिक्षाचालक साहिब याला दिल्लीला जाणाऱ्या ट्रेनबद्दल विचारलं. यावेळी त्याने ट्रेन सकाळी मिळेल असं सांगत हॉटेलवर घेऊन गेला. तिथे त्याने आणि त्याचा मित्र बाबा याने तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून लवकरच त्यांना अटक करु अशी माहिती दिली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 12, 2019 12:24 pm