28 October 2020

News Flash

हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी पकडला

मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा देखील हस्तगत

संग्रहीत

जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे आज भारतीय लष्कर व स्पेशल ऑपेरशन ग्रुपच्या जवानांनी राबवलेल्या विशेष मोहीमेत हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यास अटक करण्यात आली. विशेष म्हणजे यावेळी जवानांनी घटनास्थळावरून मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा देखील जप्त केला.

या अगोदर काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीर पोलिसांना दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाच्या एका दहशतवाद्यास अटक करण्यात यश आले होते. या अगोदर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस जवानांनी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या कारी यासीरसह तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. भारतीय जवानांचे हे देखील मोठे यश होते. या कारवाईत ठार करण्यात आलेला यासीर हा मागील वर्षी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी होता.

तर, दहा दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या शोपियन जिल्ह्यात जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. हे तिन्ही दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंधित होते. हे दहशतवादी एका घरामध्ये लपले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2020 5:45 pm

Web Title: a hizbul mujahideen terrorist has been arrested with arms and ammunition msr 87
Next Stories
1 येत्या एक फेब्रुवारीपासून स्थानिक गोवेकरांना कॅसिनोमध्ये प्रवेशबंदी
2 अर्णब गोस्वामीच्या ऑफिसबाहेर कुणाल कामराची पोस्टरबाजी, म्हणाला…
3 जेडीयूतून हकालपट्टीनंतर प्रशांत किशोर यांना ‘या’ पक्षाकडून ऑफर
Just Now!
X