03 March 2021

News Flash

दहा मुलांच्या आईला 25 वर्षानंतर ट्रिपल तलाक

दहा मुलांच्या आईला 25 वर्षानंतर ट्रिपल तलाक दिल्याची घटना घडली आहे.

राज्यसभेत मंगळवारी तिहेरी तलाक विधेयक मंजूर करण्यात आले असले तरीही मुस्लीम महिलांना तलाक देण्याचे प्रकार सुरूच आहेत. आग्रा येथे दहा मुलांच्या आईला 25 वर्षानंतर ट्रिपल तलाक दिल्याची घटना घडली आहे.

मथुरामधील सुहागनगरी पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात ही घटना घडली आहे. आज शनिवारी सकाळी 8.30 वाजता ही महिल पतीविरोधात तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचली. यावेळी महिलेने सांगितले की, शुक्रवारी रात्री शारिरिक संबंधांसाठी पती बळजबरी करत होता. त्यावेळी मी विरोध केला. माझ्या विरोधानंतर पतीने तलाक दिला आमि रागातून निघून गेला. अशी तक्रार पिडीत महिलेने पोलिसांमध्ये दाखल केली.

धक्कादायक म्हणजे, त्या दोघांच्या लग्नाला 25 वर्ष झाली आहेत. दोघांना दहा मुले आहेत. या महिलेला पतीपासून सुटका हवी आहे. मात्र, मुलांचे काय, असा प्रश्न असल्याने तिने नव्या कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यासाठी पोलिस ठाणे गाठले आहे.

यापुढे मुस्लीम समाजात पतीने पत्नीला तिहेरी तलाक देणे कायद्याने गुन्हा आहे. पतीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाला तर त्याला तीन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.  मोदी सरकारला राज्यसभेत हे विधेयक मंजूर करण्यात यश मिळवले

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2019 6:10 pm

Web Title: agra city husband said triple talaq to his wife after 25 years of marriage nck 90
Next Stories
1 फाळणीच्या ७२ वर्षांनंतर पाकिस्तानने उघडले “या” ऐतिहासिक गुरूद्वाराचे दरवाजे
2 पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसह दिसला मसूद अझहरचा भाऊ
3 सरकारला नवं तयार करता येत नाही, फक्त केलेलं उद्ध्वस्त करता येतं : राहुल गांधी
Just Now!
X