गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांना पदावरून दूर करण्याच्या हालचालींना पुन्हा एकदा वेग येण्याची लक्षणे दिसू लागली आहेत. मतदारांशी संपर्क ठेवण्यात मुख्यमंत्री असमर्थ ठरत असल्याचे पक्षाच्या अंतर्गत पाहणीत आढळून आले आहे.
गुजरातमधील भाजपच्या डोकेदुखीत आम आदमी पार्टीमुळे (आप) भर पडली आहे. विजेचा जादा दर यासह अन्य प्रश्नांवरून आपने गुजराती बांधवांच्या एका गटाशी संधान बांधले आहे. पुढील वर्षी गुजरातमध्ये निवडणुका होणार असल्याने नेतृत्वबदल करण्यास अतिविलंब नको, अशी चिंता पक्ष आणि पंतप्रधान कार्यालयाला लागली आहे. गुजरात हा पंतप्रधानांचा बालेकिल्ला असल्याने आनंदीबेन पटेल यांचा वारसदार कोण हा पक्षाला पडलेला प्रश्न आहे. आनंदीबेन पटेल यांना पदावरून दूर करणे ही औपचारिकता असल्याचे पक्षातील अनेकांचे मत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Jun 2016 रोजी प्रकाशित
आनंदीबेन पटेल यांना हटविण्याच्या हालचालींना वेग?
गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांना पदावरून दूर करण्याच्या हालचालींना पुन्हा एकदा वेग येण्याची लक्षणे दिसू लागली आहेत.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 02-06-2016 at 00:44 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anandiben patel