बनावट कागदपत्रांच्या आधारे मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियात (एमसीआय) नोंदणी करण्याच्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने वडोदरातून आणखी एका डॉक्टरला अटक केली.
योग्य पद्धतीचा अवलंब न करता चीन आणि रशियातील वैद्यकीय विद्यार्थ्यांची एमसीआयमध्ये नोंदणी करण्याच्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने एकूण १० डॉक्टर आणि कौन्सिलच्या अधिकाऱ्यांना अटक केली आहे. आवश्यक त्या मापदंडांची पूर्तता नसतानाही या  विद्यार्थ्यांना डॉक्टर म्हणून व्यवसाय करण्याची मुभा मिळाली होती. कौन्सिलमधील एका महिला कारकुनाला मंगळवारी अटक करण्यात आली. या घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. जितेंद्र जगोडिया याला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी केली असता कौन्सिलच्या अधिकाऱ्यांचाही या मध्ये सहभाग असल्याचे उघड झाले.