24 February 2021

News Flash

MADE IN INDIA: लष्करप्रमुखांनी ‘तेजस’मधून घेतला उड्डाणाचा अनुभव

लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी गुरुवारी स्वदेशी बनावटीच्या एलसीए तेजसमधून उड्डाणाचा अनुभव घेतला. तेजस हे हिंदुस्थान एरोनॉटिक्सने बनवलेले हलके लढाऊ विमान आहे.

लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी गुरुवारी स्वदेशी बनावटीच्या एलसीए तेजसमधून उड्डाणाचा अनुभव घेतला. तेजस हे हिंदुस्थान एरोनॉटिक्सने बनवलेले हलके लढाऊ विमान आहे. या फायटर विमानाचा हवाई दलातील समावेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. बंगळुरु येथे सुरु असलेल्या ‘एरो इंडिया, एअर शो’ दरम्यान बिपीन रावत यांनी तेजसमधून उड्डाणाचा अनुभव घेतला.

तेजसमधून उड्डाण हा आयुष्यभर लक्षात राहणारा अनुभव आहे. तेजस उत्तम विमान असून अचूकतेने लक्ष्यभेद करण्याची क्षमता आहे. तेजसच्या समावेशाने हवाई दलाची ताकत आणखी वाढेल असे बिपीन रावत म्हणाले. सरकारचे वैज्ञानिक सल्लागार पी.एस.राघवन सुद्धा तेजसमधून उड्डाणाचा अनुभव घेणार आहेत.

तेजस छोटे, हलके लढाऊ विमान असले तरी अन्य मोठया फायटर विमानांप्रमाणे हे विमान सुद्धा अत्याधुनिक शस्त्रास्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे. तेजसमधून क्षेपणास्त्र हल्ल्याद्वारे शत्रू विमानावर हल्ला करता येऊ शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2019 2:57 pm

Web Title: army chief bipin rawat experiences flying from lca tejas
Next Stories
1 पुलवामा हल्ल्यानंतर सैनिकांच्या सुरक्षेसाठी ‘एअर लिफ्ट’, सरकारचा मोठा निर्णय
2 पाकिस्तानकडून भारतावर सायबर हल्ला; मुख्तार अब्बास नकवी, छत्तीसगड भाजपासहित १०० वेबसाइट हॅक
3 काश्मीर प्रश्नाला पंडित नेहरूच कारणीभूत, अमित शाह यांचा आरोप
Just Now!
X