04 July 2020

News Flash

नवऱ्याच्या मृत्यूच्या दिवशी मेजरने बलात्कार केला, महिलेचा आरोप

मेजरकडे घरकाम करणाऱ्या महिलेनेच त्याच्यावर बलात्काराचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

दक्षिण पश्चिम दिल्लीमध्ये लष्कराच्या एका मेजर विरोधात बलात्काराची तक्रार दाखल झाली आहे. मेजरकडे घरकाम करणाऱ्या महिलेनेच त्याच्यावर बलात्काराचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. नवऱ्याने आत्महत्या केली त्याचदिवशी मेजरने आपल्यावर बलात्कार केला असा आरोप पीडित महिलेने केला आहे. महत्वाच म्हणजे बलात्काराची घटना १२ जुलै रोजी घडली आणि पीडित महिलेने २५ सप्टेंबरला तक्रार दाखल केली. सर्वेंट क्वार्टरमध्ये या महिलेच्या पतीने आत्महत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.

बलात्काराच्या घटनेनंतरही सदर महिला मेजरच्या घरात काम करत होती असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. पीडित महिला मूळची उत्तर प्रदेशची आहे. आरोपी लष्करात मेजर असल्यामुळे पोलीस सुरुवातीला तक्रार दाखल करुन घ्यायला तयार नव्हते. ते आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत होते असे पीडित महिलेने म्हटले आहे. आपण आपल्या नवऱ्यासह कँटॉन्मेंट परिसरातील मेजरच्या घरात काम करायचो. आपले कुटुंब तिथेच सर्वेंट क्वार्टरमध्ये रहायचे.

१२ जुलैला रात्री १० च्या सुमारास मेजरने आपल्या पतीला कामासाठी घराबाहेर पाठवून दिले व मला त्याच्या रुममध्ये बोलवले. काहीतरी चुकीच घडणार असल्याची कल्पना आल्याने आपण रुममध्ये येण्यास नकार दिला. तेव्हा मेजरने आपल्याला मारहाण केली व खेचून रुममध्ये नेले. जेव्हा माझा नवरा घरी आला तेव्हा त्याला मेजरच्या गैरकृत्याबद्दल समजले.

मेजरने माझ्या नवऱ्यालाही बेदम मारहाण केली. जेव्हा मी मध्ये पडून नवऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने आम्हाला दोघांना गोळी घालून मारण्याची धमकी दिली. त्याचवेळी मेजरने पुन्हा मारहाण सुरु केल्यामुळे आपली शुद्ध हरपली. मी शुद्धीवर आल्यानंतर मेजरने पुन्हा आपल्याला धमकावले व बलात्कार केला. त्यानंतर त्याने मला माझ्या नातेवाईकांच्या घरी जाण्यास सांगितले. मी नातेवाईकाच्या घरी निघून गेल्यानंतर काही तासांनी मेजर तिथे आला व त्याने नवऱ्याने आत्महत्या केल्याचे सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2018 3:23 pm

Web Title: army major accused of raped by domestic help
Next Stories
1 इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री दहशतवादी हाफिज सईदच्या भेटीला
2 आजपासून ‘या’ गोष्टीमध्ये होणार बदल, जाणून घ्या कुठे फायदा आणि कुठे तोटा
3 लष्कराच्या वादग्रस्त आफ्स्पा कायद्याचे पुनरावलोकन सुरु : गृहसचिव
Just Now!
X