News Flash

“हे हिंदू गद्दार…”, शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आलेल्या युवराज सिंगच्या वडिलांचं वादग्रस्त वक्तव्य

अनेकदा आपल्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे आलेत चर्चेत

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याचे वडिल योगराज सिंग कायमच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेचा विषय ठरत असतात. शेतकरी आंदोलनादरम्यान योगराज सिंग शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पोहोचले होते. परंतु हिंदूंबाबक केलेल्या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्या अटकेची मागणी केली जात आहे.

योगराज सिंग यांचं एक भाषण सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामध्ये ते हिंदू महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करताना दिसत आहेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. तसंच सध्या ट्विटरवर ‘Arrest Yograj Singh’ हा हॅशटॅगही ट्रेंड होत आहे.

अनेकांनी योगराज सिंग यांचं हे भाषण नींदनीय, अपमानजनक आणि घृणा आणणारं असल्याचं म्हटलं आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये योगराज सिंग हे पंजाबी भाषेत बोलत आहे. यादरम्यान त्यांनी हिंदूंसाठी गद्दार या शब्दाचाही वापर केला. “हे हिंदू गद्दार आहे. शंभर वर्षांपासून मुघलांची गुलामी केली,” असंही ते यात म्हणताना दिसत आहे. तसंच महिलांबाबतही त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. यापूर्वी योगराज सिंग हे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2020 12:22 pm

Web Title: arrest yograj singh trends on twitter as cricketer yuvrajs father gave controversial statement against hindus in kisan andolan delhi jud 87
Next Stories
1 अरेच्चा! ‘कोवॅक्सिन’चा डोस घेतलेल्या हरयाणाच्या आरोग्यमंत्र्यांनाच झाला करोना
2 शेतकरी संसदेला घेरण्याच्या तयारीत; आजच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष
3 ममता बॅनर्जींनी भरला दम; म्हणाल्या,”जो विरोधकांच्या संपर्कात तो तृणमूल…”
Just Now!
X