भारताने अमेरिकेसोबत ऐतिहासिक BECA करार केला आहे. भारताने या करारावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे चीनचा चांगलाच तिळपापड झाला आहे. BECA करारामुळे भारत-अमेरिका लष्करी संबंध अधिक बळकट होणार आहेत. त्यामुळे चिनची चिंता वाढली आहे. भारत आणि चीनमध्ये मागच्या आठवडयात आठव्या फेरीची कॉर्प्स कमांडर स्तरावरील बैठक होणार होती. पण चीनने जाणीवपूर्वक या बैठकीला विलंब केला आहे.

भारत-अमेरिका टू प्लस टू चर्चेसाठी सोमवारी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ व संरक्षण मंत्री मार्क टी एस्पर सोमवारी भारतात दाखल झाले. भारत-अमेरिकेमध्ये वेगाने विस्तारत असलेल्या संरक्षण संबंधांमुळे चीनची चिंता वाढत चालली आहे. पूर्व लडाख सीमेवर दादागिरी करणाऱ्या चीनला या संरक्षण सहकार्य करारामुळे भविष्यात निश्चित फटका बसेल. टाइम्स नाऊने हे वृत्त दिले आहे.

आणखी वाचा- अमेरिकेच्या परराष्ट्र, संरक्षण मंत्र्यांसोबत NSA डोवाल यांची महत्त्वाची बैठक

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ व संरक्षण मंत्री मार्क टी एस्पर टू प्लस टू बैठकीसाठी भारतात आले आहेत. त्यांनी मंगळवारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली. डोवाल आणि अमेरिकेच्या दोन्ही मंत्र्यांमध्ये रणनितीक मुद्दे आणि दोन्ही देशांसमोरील आव्हानांवर चर्चा करण्यात आली.

आणखी वाचा- ‘आम्ही आमच्या भूमीवर लढूच’ पण…NSA डोवाल यांचे महत्त्वाचे विधान

पॉम्पिओ चार देशांच्या दौऱ्यावर आहेत. भारतापासून त्यांच्या या दौऱ्याला सुरुवात होत आहे. त्यानंतर ते श्रीलंका, मालदीव आणि इंडोनेशिया या देशांमध्ये जाणार आहेत. लडाख सीमेवर तणावाची स्थिती असताना, पॉम्पिओ आणि एस्पर यांचा हा दौरा खूप महत्त्वपूर्ण आहे. अमेरिकेतील वृत्तानुसार, चीनला रोखणे हाच पॉम्पिओ यांच्या चार देशांच्या दौऱ्यामागचा मुख्य उद्दश आहे.