25 February 2021

News Flash

चेन्नई : जमात-उल-मुजाहिद्दीन बांग्लादेशचा दहशतवादी अटक

कोलकाता पोलिसांनी २ सप्टेंबर रोजी देखील घेतले होते एकास ताब्यात

(संग्रहित छायाचित्र)

राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए)  मंगळवारी सकाळी चेन्नईतून एका दहशतवाद्यास अटक केली. हा दहशतवादी बांग्लादेशमधील दहशतवादी संघटनेशी निगडीत असल्याची माहिती आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी दहशतवाद्याचा ठिकाणा असलेल्या संपूर्ण परिसरास वेढा दिला होता.

जमात-उल-मुजाहिद्दीन बांग्लादेश (जेएमबी) या संघटनेचा हा दहशतवादी असून असदुल्लाह शेख असे त्याचे नाव आहे. या दहशतवादी संघटनेचे १०४ संशयित दहशतवादी एनआयएच्या रडारावर असल्याची माहिती आहे.

या अगोदर २ सप्टेंबर रोजी कोलकाता पोलिसांच्या विशेष कृती दलाने दहशतवादी संघटना जमात-उल-मुजाहिद्दीन बांग्लादेश (जेएमबी) च्या एका संशयितास अटक केली होती. प्राप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी गजनबी पूलाजवळ २२ वर्षीय मोहम्मद अब्दुल कासिम उर्फ कासिमला अटक केली होती. तो बर्दवान जिल्ह्यातील मंगलकोटे पोलीस ठाणे हद्दीताल दुरमुट गावचा रहिवासी होता. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारेच असदुल्लाह शेखला अटक करण्यात आली असल्याचे समोर आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2019 2:22 pm

Web Title: asadullah sheikh a suspected jamaat ul mujahideen bangladesh terrorist was arrested msr 87
Next Stories
1 के. सिवन यांचे सोशल नेटवर्किंग साईटवर कोणतेही अकाऊंट नाही, इस्त्रोने दिली माहिती
2 झिरो बजेट शेती म्हणजे बोगस तंत्रज्ञान; राष्ट्रीय कृषी विज्ञान अकादमीचा दावा
3 50 लाखांच्या विम्यासाठी दिली स्वत:चीच सुपारी अन…
Just Now!
X