बदलापुरातील आश्रमावर हल्ला प्रकरणात दरोडा व दंगल यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असलेला राष्ट्रवादीचा नगरसेवक आशिष दामले याला पोलीसांनी मंगळवारी मध्य प्रदेशातून ताब्यात घेतले.
बदलापूरपासून जवळ असलेल्या इंदगाव येथे नरेश रत्नाकर यांच्या साधना भवन या आश्रमात दोन जून रोजी रात्री ११च्या सुमारास दहा-पंधरा कार्यकर्त्यांसमवेत शिरलेल्या दामले याने तेथे तोडफोड केली. तसेच येथील कर्मचाऱ्यांना मारहाणही केली. याप्रकरणी कुळगाव-ग्रामीण पोलीस ठाण्यात दामलेवर दरोडय़ाच्या गुन्ह्यासह धमकावणे, घराची तोडफोड करणे, बंदुकीचा धाक दाखवून लुटमार करणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेनंतर फरार असलेल्या दामलेला कल्याणच्या जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला होता. त्यानंतरही तो मध्य प्रदेशातील इंदूर, देवासमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राहात होता. पोलीस सातत्याने त्याच्या मागावर होते. दामले ओरसा येथे असल्याची माहिती पोलीसांना मिळाल्यावर मंगळवारी सकाळी तेथील एका हॉटेलवर छापा टाकून पोलीसांनी त्याला अटक केली.
संग्रहित लेख, दिनांक 9th Jun 2015 रोजी प्रकाशित
अखेर आशिष दामलेला अटक, मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात
बदलापुरातील आश्रमावर हल्ला प्रकरणात दरोडा व दंगल यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असलेला राष्ट्रवादीचा नगरसेवक आशिष दामले याला पोलीसांनी मंगळवारी मध्य प्रदेशातून ताब्यात घेतले.

First published on: 09-06-2015 at 07:30 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashish damle arrested from madhya pradesh