मुक्तीसंग्राम लढाईच्या ४८ वर्षानंतर बांगलादेशने सीमेवर असणाऱ्या सर्व खांबांवरुन पाकिस्तानचे नाव हटवले आहे. १९४७ सालच्या भारत-पाकिस्तान फाळणीनंतर हे खांब बसवण्यात आले होते. बॉर्डर गार्ड बांगलादेशने स्वत:च्या पैशातून हे काम पूर्ण केले.

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या निर्देशावरुन सीमेवर असणाऱ्या खांबांवरुन पाकिस्तान नाव हटवण्याचे काम करण्यात आले. १९७१ सालच्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर बांगलादेशची निर्मिती झाली होती.

त्यानंतर ४८ वर्षांनी पाकिस्तानचे नाव हटवण्यात आले. आता बांगलादेशात सीमेवरील सर्व खांबांवर पाकिस्तान/पीएके ऐवजी बांगलादेश/बीडी हे नाव असेल असे बीजीबीकडून सांगण्यात आले. १९७१ सालच्या युद्धात भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव करुन बांगलादेश या नव्या देशाची निर्मिती केली.