News Flash

‘मोदींच्या नावावर पंचायत निवडणूकही लढवतील’

भाजप पक्षात नेतृत्वाचा अभाव असल्याने खुद्द पंतप्रधानांना रणांगणात उतरावे लागले आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (संग्रहित छायाचित्र)

भाजप पक्षात नेतृत्वाचा अभाव असल्याने खुद्द पंतप्रधानांना रणांगणात उतरावे लागले आहे. मोदी यांच्या नावावर आता पंचायत निवडणुकही लढवल्या जातील असे म्हणत नितीश कुमार यांनी आज पंतप्रधानांच्या बिहारमधील सभांची खिल्ली उडवली. विधानसभा निवडणुकीपूर्वी बिहारमधील नवाडा येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. पहिल्या टप्प्यातील मतदान सोमवारी होणार असून त्यासाठीचा प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस होता.
आमच्यामध्ये एकता आहे. लालू प्रसाद, कॉंग्रेस आणि आम्ही मिळून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरविला आहे. आम्ही सोबत निवडणुक लढवित आहोत. मात्र बिहारमधील भारतीय जनता पक्षामध्ये उमेदवारच नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाखाली निवडणुक लढविण्यात येत असल्याचे सांगत त्यांनी राज्यनेतृत्वावर टीका केली. तसेच, बिहारशी गोमांसच्या मुद्द्याचे काहीही देणेघेणे नसताना मोदी विनाकारण सभांमध्ये या मुद्द्यावर बोलत असल्याचेही त्यांनी म्हटले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2015 6:19 pm

Web Title: bihar chief minister nitish kumar addresses rally in nawada
Next Stories
1 अंकारामध्ये रेल्वे स्टेशनजवळ आत्मघातकी हल्ला; २० जण ठार
2 गुलाम अलींचा दिल्लीतील कार्यक्रमही उधळून लावण्याचा शिवसेनेचा इशारा
3 सारा जोसेफ यांनी परत केला साहित्य अकादमी पुरस्कार
Just Now!
X