News Flash

भाजपा नेत्या उमा भारती करोना पॉझिटिव्ह

संपर्कात आलेल्यांना स्वतःची करोना टेस्ट करून घेण्याचे केले आवाहन

संंग्रहीत

माजी मुख्यमंत्री व भाजपाच्या नेत्या उमा भारती करोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. उमा भारती यांनी स्वतः ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी प्रशासकीय पथकास याबाबत माहिती देऊन बोलवून घेतले व स्वतःची तपासणी करून घेतली आहे. सध्या ऋषिकेश आणि हरिद्वारच्या मध्यात असलेल्या एका ठिकाणी त्यांनी स्वतःला क्वारंटाइन करून घेतलं आहे.

मी तुमच्या माहितीस्वत हे सांगत आहे की, मी आज माझ्या यात्रेच्या शेवटच्या दिवशी प्रशासनास आग्रह करून स्वतःची करोना टेस्ट करून घेतली. कारण, मला तीन दिवसांपासून ताप होता. मी हिमालय यात्रेदरम्यान कोविडच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलेल्या सर्व सुचनांचे व नियमांचे पालन केले आहे. मात्र तरी देखील मी करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. मी सध्या हरिद्वार व ऋषिकेश दरम्यान असलेल्या वंदे मातरम कुंज येथे क्वारंटाइन आहे, जे की माझ्या परिवारासारखेच आहे. चार दिवसानंतर पुन्हा तपासणी करून घेणार आहे. जर परिस्थिती अशीच राहिली तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार निर्णय घेणार आहे. अशी माहिती उमा भारती यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2020 8:30 am

Web Title: bjp leader uma bharti corona positive msr 87
Next Stories
1 PM मोदी यांची ‘मन की बात’; या मुद्द्यांवर करु शकतात संबोधित
2 चीनच्या कूटनीतीला मोदी यांचा धक्का
3 भारताला किती काळ डावलणार?
Just Now!
X