काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आरक्षणाच्या मुद्यावरून पंतप्रधान मोदी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीकास्त्र सोडलं आहे. भाजपा व आरएसएसची विचारसरणी आरक्षणाच्या विरोधातील आहे. त्यांना एससी,एसटी समजातील लोकांचा विकास नकोय, असा आरोप राहुल गांधींनी केला आहे.

“भाजपा आणि आरएसएसची विचारसरणी आरक्षण विरोधी आहे. त्यांना एससी/एसटी समाजातील लोकांचा विकास नकोय, ते संस्थात्मक रचना मोडीत काढत आहेत. मी एससी, एसटी, ओबीसी व दलितांना सांगू इच्छितो की, आम्ही आरक्षण कधीच संपुष्टात येऊ  देणार नाही, हा घटनेचा मुख्य भाग आहे. यासाठी मोदीजी किंवा भागवत यांनी कितीही स्वप्न पाहिली तरी काही फरक पडणार नाही.” असं राहुल गांधी म्हणाले.

आज राज्यघटनेवर आक्रमण होत आहे. भाजपा व आरएसएस कोणत्या ना कोणत्या प्रकारे आरक्षण घटनेतुन काढू इच्छित असल्याचाही राहुल गांधी यांनी आरोप केला आहे.

आणखी वाचा – अ‍ॅट्रॉसिटीच्या प्रकरणात विनाचौकशी होणार गुन्हा दाखल; सर्वोच्च न्यायालयाकडून दुरूस्तीला हिरवा कंदिल

अ‍ॅट्रॉसिटी प्रतिबंधक कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचा निकाल दिला आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात करण्यात येणारी दुरूस्ती घटनाबाह्य नसल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयानं कायद्याला हिरवा कंदील दाखवला आहे. न्यायालयाच्या निकालामुळे अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणात कोणत्याही चौकशीशिवाय गुन्हा दाखल करता येणार असून, आरोपीच्या अटकपूर्व जामीनाचा मार्गही बंद झाला आहे.