चीनबरोबर सीमावादावरून तणाव असतानाच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चिनी मालावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. भारतीय बाजारपेठ ताब्यात घेण्याचे चीनचे प्रयत्न हाणून पाडा, असे आवाहन संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी केले आहे. चिनी बनावटीच्या मालाला तोंड देण्यासाठी स्वदेशी वस्तूंचा आग्रह महत्त्वाचा असे भैय्याजी जोशी यांनी सांगितले.

सीमेवर चीनची घुसखोरी रोखण्यासाठी आपले जवान समर्थ आहेत. मात्र आर्थिक गुलामगिरी रोखण्यासाठी भारतीय बाजारपेठेत चीनी वस्तूंचा शिरकाव रोखा असे आवाहन भैय्याजींनी केले.

त्यांच्या उपस्थितीत येथील महाविद्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. आधुनिकीकरणाला आमचा विरोध नाही. मात्र एखाद्या देशाची आर्थिक गुलामगिरी आपण धुडकावून लावली पाहिजे. स्वयंपूर्णतेकडे देशाची वाटताल सुरू असून, युवकांनी देशाच्या विकासात योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले.