News Flash

लग्नाच्या काही तास आधी नवरीमुलीचं अपहरण, घटना सीसीटीव्हीत कैद

अपहरण झाल्यामुळे लग्न रद्द करण्यात आलं

पंजाबमध्ये लग्नाच्या काही तासांपूर्वी नवरीमुलीचं अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 25 जानेवारीला हे अपहरण करण्यात आलं. सात जणांनी बंदुकीचा धाक दाखवत 19 वर्षीय नवरीमुलीचं गांधी चौकातील ब्युटी पार्लरमधून अपहरण केलं. जवळच्या दुकानात असणाऱ्या सीसीटीव्हीत सर्व घटना कैद झाली होती. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोघा आरोपींना अटक केली असून इतर फरार आहेत.

लग्नाच्या तयारीसाठी तरुणी ब्युटी पार्लरमध्ये आली होती. यावेळी आरोपींनी तिला पाहताच कारपर्यंत ओढत नेलं आणि अपहरण केलं. यावेळी तरुणीने प्रतिकार करत त्यांच्यापासून सुटका करुन घेतली होती. पण आऱोपींनी पुन्हा तिला ओढत कारमध्ये नेलं आणि पळ काढला. यावेळी आरोपी तिथे उपस्थित कोणीही मदतीला धावू नये यासाठी बंदुकीचा धाक दाखवत होते.

पोलिसांनी दिलेल्या तक्रारीत तरुणीच्या भावाने तलविंदर सिंह, यदविंदर सिंह यांच्यासहित काही अज्ञातांवर संशय व्यक्त केला होता. यानंतर पोलिसांनी पाच पथकं तयार करत तपास सुरु केला. अखेप फिरोजपूर कँट येथे तरुणी सापडली. अपहरण झाल्यामुळे शनिवारी होणारं लग्न रद्द करण्यात आलं.

मुक्तसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रार मिळताच आम्ही गुन्हा दाखल करुन घेत तरुणीच्या शोधासाठी पथकं रवाना केली होती. काही तासांतच तरुणीचा शोध लागला आणि दोघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांची नावे बलजित सिंह आणि हरप्रीत सिंह अशी आहेत. मुख्य आरोपी तलविंदर आणि इतर चार आरोपी अद्याप फरार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2019 11:07 am

Web Title: bride abducted few hours before marriage in punjab
Next Stories
1 प्रसिद्ध लेखिका गीता मेहता यांचा ‘पद्मश्री’ स्वीकारण्यास नकार
2 Republic Day 2019: मोदींचं सोशल मीडियास्त्र त्यांच्यावरच उलटलं आहे का?
3 प्रजासत्ताक दिनी सुरक्षा दलांचा दहशतवाद्यांना दणका, दोघांना कंठस्नान
Just Now!
X