14 November 2019

News Flash

हनी ट्रॅप: महिलेसोबत नको त्या अवस्थेत फोटो काढून बिझनेसमॅनला केले ब्लॅकमेल

फेसबुकवरुन अनोळखी महिलेसोबत मैत्री करणे गुजरातमधील एका बिझनेसमॅनला चांगलेच महागात पडले आहे. गिरीश भूत असे फसवणूक झालेल्या व्यक्तिचे नाव आहे.

संग्रहित छायाचित्र

फेसबुकवरुन अनोळखी महिलेसोबत मैत्री करणे गुजरातमधील एका बिझनेसमॅनला चांगलेच महागात पडले आहे. गिरीश भूत असे फसवणूक झालेल्या व्यक्तिचे नाव आहे. गिरीश भूत (३७) यांना हनी ट्रॅपच्या जाळयात अडकवून एका टोळक्याने त्यांच्याकडून १० लाख रुपये उकळण्याचा प्रयत्न केला. या कटामध्ये एकूण सहाजण सहभागी होते. त्यामध्ये तीन महिला होत्या. या महिलांनी पैसे दिले नाही तर बलात्काराची खोटी तक्रार दाखल करु अशी धमकी गिरीश यांना दिली.

गिरीश भूत यांच्या मालकीची एक फॅक्टरी असून ते मावडी चौक येथे राहतात. तीन महिन्यांपूर्वी त्यांनी फेसबुकवरुन जान्हवी अहीर नावाच्या महिलेबरोबर मैत्री केली. बुधवारी जान्हवीने त्यांना जामनगर रस्त्यावरील नागेश्वर एरिया येथे भेटण्यासाठी बोलावले. गिरीश त्यांच्या बाईकवरुन तिथे पोहोचल्यानंतर आधीपासूनच तिथे उपस्थित असलेल्या गीता, रसिला, केतन, कुलदीप आणि आणखी एका व्यक्तिने त्यांना जबरदस्तीने निर्जन स्थळी घेऊन गेले. रींग रोड येथील बांधकाम चालू असलेल्या इमारतीत ते गिरीश यांना घेऊन गेले.

तिथे या सर्वांनी गिरीश यांना जबरदस्तीने कपडे उतरवण्यास भाग पाडले व जान्हवी नावाची महिला सुद्धा विवस्त्र झाली. त्यानंतर अन्य पाच जणांनी या दोघांचे नेकेड अवस्थेतील फोटो काढले. एवढयावरच हे सर्व थांबले नाही. त्यांनी गिरीश यांना जबरदस्तीने हस्तमैथुन करायला भाग पाडले व वीर्य जमा करुन घेतले. त्यानंतर या महिलांनी गिरीश यांच्याकडे १० लाख रुपयाची मागणी केली. पैसे दिले नाही तर बलात्काराची तक्रार दाखल करण्याची धमकी त्यांनी दिली.

आपल्याकडे इतके पैसे नाहीत हे गिरीश यांनी पटवून दिल्यानंतर पाच लाख रुपयांचा सौदा ठरला. पण या टोळक्याला त्यांच्याकडून तात्काळ १ रुपये हवे होते. अखेर गिरीश यांनी त्यांचा भाऊ शैलेशला फोन लावला व १ लाख रुपये देण्यास सांगितले. शैलेशला काहीतरी अघटित घडल्याचा संशय आला व त्याने लगेच पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी त्यानंतर सापळा रचला व शैलेशला भावाला फोन करुन राया क्रॉसरोडवर येण्यास सांगितले. गीता आणि रसिला भूत यांच्या बाईकवरुन पैसे घेण्यासाठी आल्या त्यावेळी पोलिसांनी त्यांना लगेच अटक केली.

 

First Published on April 27, 2018 8:53 am

Web Title: businessman in honey trapped
टॅग Gujarat