ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या करोनाच्या नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यूकेमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी)जाहीर केली आहे. भारताने आठवडाभरासाठी यूकेला जाणाऱ्या विमान प्रवासावर तात्पुरती बंदी घातली होती. त्यानंतर ८ जानेवारीपासून ही बंदी उठवण्यात येणार आहे. त्यामुळे या दिवसापासून युकेतून भारतात येणाऱ्या प्रवाशांना काही विशिष्ट नियमांचे पालन करावे लागणार आहे.

काय आहे ही एसओपी?

८ जानेवारी ते ३० जानेवारी २०२१ या कालावधीसाठी ही नवी एसओपी लागू असणार आहे. त्याचबरोबर या काळात युकेमधून भारतात येणाऱ्या विमानांतील प्रवाशांसाठी विमानतळांवर पुढील कारवाई केली जाणार आहे.

डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशननं (डीजीसीए) विमान कंपन्यांना आदेश दिले आहेत की, यूकेतून भारतात येणाऱ्या फ्लाईट्समध्ये विशिष्ट कालावधींचं अंतर ठेवावं लागणार आहे. कारण, पहिल्या फ्लाईटमधून आलेल्या प्रवाशांनंतर त्यांची तपासणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत विमानतळांवर गर्दी होणार नाही याची काळजी विमान कंपन्यांना घ्यावी लागणार आहे. यूके ते भारत या प्रवासादरम्यान ट्रान्झिट एअरपोर्ट किंवा तिसऱ्या देशातून प्रवाशांना प्रवेश देऊ नये याची कंपन्यांनी काळजी घ्यायची आहे.

  1. आंतरराष्ट्रीय प्रवाशांना त्यांच्या १४ दिवसांची प्रवासाची माहिती द्यावी लागणार आहे. तसेच कोविड-१९ची तपासणी झाल्याचे स्वंय घोषणापत्र ऑनलाइन पोर्टलद्वारे (www.newdelhiairport.in) प्रवासाच्या ७२ तासांपूर्वी द्यावं लागणार आहे.
  2. युकेतून भारतात येणाऱ्या सर्व प्रवाशांनी स्वतःसोबत आपली आरटी-पीसीआर चाचणी झाल्याचे आणि ती निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र जवळ बाळगणे गरजेचे आहे. प्रवासापूर्वी ७२ तास आधी ही चाचणी केलेली असावी. हा चाचणी अहवालही http://www.newdelhiairport.in या पोर्टलवर सबमिट करायचा आहे.
  3. निगेटिव्ह चाचणी अहवाल असल्याशिवाय प्रवाशांना विमानात बसण्याची परवानगी देण्यात येऊ नये.
  4. फ्लाईटमध्ये बसल्यानंतरही प्रवाशांना या प्रक्रियेची माहिती देण्यात यावी. ही माहिती विमानतळांच्या आरायव्हल एरिया, वेटिंग एरियामध्ये प्रामुख्याने लावण्यात यावी.
  5. युकेमधून भारतात आलेल्या सर्व प्रवाशांना स्वतःच्या खर्चाने विमानतळांवर पुन्हा आरटी-पीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे.
  6. प्रवाशांच्या आरटी-पीसीआर चाचणीसाठी पुरेशी व्यवस्था करणे तसेच त्यांच्यासाठी विमानतळांवर प्रभावी आयसोलेशनची व्यवस्था करण्यात यावी, असे डीजीसीएनं म्हटलं आहे.
  7. या एसओपीच्या अंमलबजावणीसाठी राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्रवाशांसाठी विमानतळांवर हेल्पडेस्क स्थापन करावा.
  8. जर प्रवाशांची चाचणी पॉझिटिव्ह आली तर त्यांना संस्थात्मक आयसोलेशनमध्ये ठेवण्यात यावं. याची जबाबदारी संबंधित राज्यांची असून त्यांना या ठिकाणी योग्य उचपार दिले जावेत. तसेच पॉझिटिव्ह नमुने हे indian SARS-CoV-2 Gnomics Consortium (INSACOG) lab मध्ये पाठवण्यात यावेत, असे आदेश डिजीसीएने दिले आहेत.

यूके ते भारत विमान उड्डाणांचा तपशील

भारतातून यूकेला जाणाऱ्या विमानांना ६ जानेवारीपासून परवानगी देण्यात आली आहे तर युकेतून भरतात येणारी विमानसेवा ८ जानेवारीपासून सुरु होत आहे. प्रत्येक आठवड्याला ३० विमानांची उड्डाणं होतील. यांपैकी १५ भारतीय तर १५ युकेची विमानं असतील. या विमान उड्डाणांचं वेळापत्रक २३ जानेवारीपर्यंत लागू असेल, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली.