06 March 2021

News Flash

Agusta westland: ऑगस्टा वेस्टलॅंड आणि विजय मल्ल्या प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयची एसआयटी

पुरेसे पुरावे मिळाल्यानंतर सीबीआयकडून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे

ऑगस्टा वेस्टलॅंड प्रकरणात इटलीतील तपास पथकाकडून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे सीबीआयच्या पथकाने प्राथमिक तपास केला आहे.

ऑगस्टा वेस्टलॅंड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणातील लाचखोरीचा आणि उद्योगपती विजय मल्ल्या यांच्याशी संबंधित पैशांची अफरातफर प्रकरणाचा तपास करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) विशेष तपास पथक (एसआयटी) गुरुवारी स्थापन केले.
ऑगस्टा वेस्टलॅंड प्रकरणात इटलीतील तपास पथकाकडून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे सीबीआयच्या पथकाने प्राथमिक तपास केला आहे. या हेलिकॉप्टर खरेदीमध्ये लाचखोरी झाल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर या व्यवहाराला तत्कालिन संरक्षण मंत्री ए. के अॅंटनी यांनी स्थगिती दिली होती. त्या पार्श्वभूमीवर लाचखोरीची रक्कम नक्की कोणाला मिळाली, याचा तपास सीबीआयकडून करण्यात येतो आहे. पुरेसे पुरावे मिळाल्यानंतर सीबीआयकडून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
विजय मल्ल्या यांच्याविरोधात एकाहून अधिक आरोपपत्र दाखल करण्याचे सीबीआयने ठरवले आहे. आयडीबीआय बँकेचे ९०० कोटींचे कर्ज मल्ल्या यांनी बुडवले असून त्याची चौकशी सीबीआय करीत आहे. त्याचबरोबर या बॅंकेसहित इतर बॅंकांचे नऊ हजार कोटींचे कर्ज थकवल्याच्या प्रकरणात मल्ल्या यांची सक्तवसुली संचालनालयाकडूनही चौकशी सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2016 4:48 pm

Web Title: cbi forms a sit to probe into the corruption cases including agusta westland and vijay mallya case
टॅग : Cbi,Vijay Mallya
Next Stories
1 रघुराम राजन यांचे काम उत्तम, केंद्रीय मंत्री राज्यवर्धन राठोड यांच्याकडून कौतुक
2 समजून घ्या, ‘उडता पंजाब’ला पाठिंबा देऊन ‘आप’ला नक्की काय साधायचंय?
3 मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष स्वत: गाडी चालवत मोदींना रेस्टॉरंटमध्ये नेतात तेव्हा…
Just Now!
X