News Flash

‘टॉक टू एके कँपेन’ प्रकरणी सीबीआयची टीम उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांच्या घरी

सीबीआयने हा छापा नसल्याचे म्हटले आहे.

Manish Sisodia : सीबीआय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या 'टॉक टू एके' या अभियानात आर्थिक अनियमिततेची तपासणी करत आहे

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांकडे ‘टॉक टू एके’ प्रकरणी चौकशीसाठी केंद्रीय अन्वेषण विभागाची (सीबीआय) टीम त्यांच्या घरी पोहोचली आहे. सीबीआय या प्रकरणी त्यांचे म्हणणे ऐकून घेणार आहे. सिसोदिया यांच्यावर ‘टॉक टू एके’ कार्यक्रमात आर्थिक अनियमितता केल्याचा आरोप आहे. सीबीआयने हा छापा नसून केवळ या प्रकरणी सिसोदिया यांचे म्हणणे नोंदवून घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयची ६ सदस्यीय टीम सिसोदिया यांच्या घरी पोहोचली आहे. सीबीआय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ‘टॉक टू एके’ या अभियानात आर्थिक अनियमिततेची तपासणी करत आहे. या अभियानात बेकायदापणे एका कंपनीला टेंडर देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. सीबीआयने या प्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि इतरांविरोधात प्राथमिक तपासाची नोंद केली होती.

आम आदमी पक्षाने आपल्या ट्विटर हँडलवर सीबीआयने छापा टाकला असल्याचे म्हटले आहे. कारण ते रात्रंदिवस सरकारी शाळांना खासगी शाळांपेक्षा उत्कृष्ठ बनवत असल्यामुळेच मनीष सिसोदियांच्या घरावर छापे टाकण्यात येत आहे, असे आपने ट्विट केले आहे. तर सीबीआयने मात्र हा छापा नसून केवळ सिसोदियांचे म्हणणे नोंदवण्यासाठी सीबीआयचे अधिकारी त्यांच्याकडे गेल्याचे म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2017 2:37 pm

Web Title: cbi reaches delhi deputy chief minister manish sisodias residence for talk to ak campaign
Next Stories
1 अयोध्येतील इफ्तार पार्टीत मुस्लिमांनी गाईचे दूध पिऊन उपवास सोडला!
2 नितीशकुमार यांच्या ताफ्यातील कारला अपघात; ६ पोलीस जखमी
3 काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले; २ पोलीस शहीद, १ जखमी
Just Now!
X