इशरत जहाँ बनावट चकमकप्रकरणी सीबीआयचे पूरक आरोपपत्र तयार असून, लवकरच ते न्यायालयात सादर करण्याची शक्यता आहे. या आरोपपत्रात गुप्तचर विभागाचे (आयबी) चार अधिकाऱ्यांचा समावेश असेल. आयबीचे माजी विशेष संचालक राजिंदर कुमार यांच्यासह राजीव वानखेडे, एम. के. सिन्हा आणि टी. मित्तल या अधिकाऱ्यांवरही आरोप असल्याने त्यांचाही आरोपपत्रात समावेश असल्याची शक्यता आहे. इशरत जहाँची चकमक झाली, त्या वेळी हे चारही अधिकारी गुजरातमध्ये कार्यरत होते. त्यांचा या चकमकीशी संबंध काय आहे, याचा तपास सीबीआयने केला होता.