चीन बरोबरच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर लष्कराची सज्जता वाढवण्यासाठी सरकारने ५० हजार  अतिरिक्त  जवान तैनात करण्याची मान्यता दिली. त्यासाठी ६५ हजार कोटी खर्च येणार आहे.पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीने या प्रस्तावाला मान्यता दिल्याचे सूत्रांनी सांगितले. लष्करप्रमुख जनर विक्रमसिंग आणि हवाईदल प्रमुख एनएके ब्राऊन बैठकीवेळी पंतप्रधान कार्यालयात उपस्थित होते. या संदर्भात जर समितीच्या सदस्यांना काही स्पष्टीकरणाची गरज भासली तर ते देण्यासाठी ते उपस्थित होते. या प्रकरणी लष्कराने २०१० मध्ये प्रस्ताव दिला होता. मात्र तिन्ही सेना दलांनी एकत्रितपणे योजनांवर काम करावे असे सुचवले होते.