कर्नाटक सरकारकडून प्रस्ताव आल्यानंतर आठ वर्षांनी केंद्र सरकारने कर्नाटकमधील १२ शहरांच्या नामकरणाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे बेळगावचे नामकरण बेळगावी आणि बंगलोरचे नामकरण बंगळुरू झाले आहे. कर्नाटकमधील १२ शहरांचे नामकरण कन्नड भाषेतील उच्चारांप्रमाणे असावे, असा प्रस्ताव कर्नाटक सरकारने २००६ मध्ये दिला होता त्याला केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी मान्यता दिली. रेल्वे मंत्रालय, टपाल विभाग, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय आणि गुप्तचर यंत्रणेने नामकरणाला ना-हरकत दर्शविल्यानंतर ही मंजुरी दिली गेली. बेळगाव (बेळगावी), मंगलोर (मंगळुरू), बेल्लारी (बल्लारी), बिजापूर (विजापुरा), चिकमंगळूर (चिकमंगळुरू), गुलबर्गा (कलाबुरागी), मैसोर (मैसूर), हुबळी (हुब्बळ्ळी) आदींचे नामकरण करण्यात आले आहे.