मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव विचाराधीन आहे, असे लोकसभेत आज केंद्र सरकारने म्हटले आहे.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव सरकारला मिळाला आहे काय, या प्रश्नावर अभिजात मराठी भाषा समितीने प्रस्ताव पाठवलेला नाही, असे  सांस्कृतिक मंत्री महेश तिवारी यांनी सांगितले. एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी त्या भाषेचा दर्जा उच्च असावा लागतो. तिचा इतिहास १५०० ते २००० वर्षांचा असावा लागतो. त्यात प्राचीन साहित्य असावे लागते व ती भाषा मौल्यवान वारसा असावा लागतो. साहित्यिक परंपरा अस्सल असावी लागते, अभिजात भाषा व साहित्य हे आधुनिक साहित्यापेक्षा वेगळे असावे लागते. त्याची अनेक रूपे विकसित झालेली असावी लागतात. मंत्र्यांनी सांगितले की, तामिळ, संस्कृत, कन्नड, तेलगू, मल्याळम, ओडिया यांना अभिजात भाषांचा दर्जा मिळालेला आहे.