बनारस हिंदू विद्यापीठात (BHU) आता भूत विद्या शिकवली जाणार आहे. भूत विद्येचा हा अभ्यासक्रम सहा महिन्यांचा असणार आहे. आत्मा, भूतबाधा, पछाडणे, सायन्स ऑफ पॅरानॉर्मल या गोष्टींचा परिणाम व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर होतो. अशा धारणांमुळे समाजातील काही व्यक्तींचे व्यवहारही प्रभावित होतात. बुद्धिला न पटणारे प्रसंग, घटना, योगायोग या सगळ्यांचा शतकानुशतके माणसाच्या मनावर पगडा राहिला आहे. आयुर्वेदाच्या आठ प्रमुख शाखांपैकी भूतविद्याही एक आहे. याद्वारे मानसिक प्रवृत्तींचा अभ्यास केला जाणार आहे. याच विद्या शाखेद्वारे लोकांच्या मानसिक आजारांवर उपचार करण्याच्या हेतूने हा अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार असल्याचं बनारस हिंदू विद्यापीठानं म्हटलं आहे.

प्रा. व्ही. के. द्विवेदी यांनी हा अभ्यासक्रम रचला आहे. बनारस हिंदू विद्यापीठाच्या अभ्यासक्रम मंडळाने या विषयाचा अंतर्भाव आपल्या अभ्यासक्रमात केला आहे. ग्रामीण भारतात आजही अंधश्रद्धेचा पगडा आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती खऱ्या उपचारांपासून वंचित राहू शकते. हा कोर्स केलेले विद्यार्थी मानसिक उपचार न मिळणाऱ्या, त्यांना भूत बाधा मानली जाणाऱ्या भागात जाऊन रुग्णांवर उपचार करणार आहेत. असंही समजतं आहे.

drowning to death
अमेरिकेपाठोपाठ स्कॉटलंडमधून वाईट बातमी, दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू
ragging case in Pune, pune,
पुण्यातील रॅगिंग प्रकरणाला धक्कादायक वळण! अधिष्ठाताच संशयाच्या भोवऱ्यात
mumbai university , law students
पुनर्मूल्यांकन अर्जांचा गोंधळ: मुंबई विद्यापीठाच्या विधि शाखेच्या नवव्या सत्राचे विद्यार्थी संभ्रमात
Law College Student Attendance
विधी महाविद्यालय विद्यार्थी उपस्थिती : ७५ टक्के उपस्थितीच्या नियमाच्या अंमलबजावणीचे आदेश देण्याची न्यायालयाला मागणी

बनारस हिंदू विद्यापीठात या अभ्यासक्रमाची सुरुवात जानेवारीपासून केली जाणार आहे. या कोर्सची फी ५० हजार रुपये असू शकते. या अभ्यासक्रमाचा प्रवेश मेरिटच्या आधारे दिला जाणार आहे अशी माहिती आयुर्वेद विभागाच्या डीन यामिनी त्रिपाठी यांनी दिली. भूत विद्या शिकवण्यासाठी एक वेगळी समितीही स्थापण्यात आली आहे असंही त्रिपाठी यांनी सांगितलं.

ज्यांच्याकडे एमबीबीएस किंवा बीएएमएस डिग्री आहे म्हणजेच जे डॉक्टर आहेत अशांनाच हा अभ्यासक्रम शिकता येणार आहे. भुता-खेतांबद्दल ज्या अंधश्रद्धा आहेत जे काही समज आहेत ते दूर करण्यासाठी काय करता येईल? या सगळ्याचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. भूत विद्या ही आयुर्वेदाच्या आठ मुख्य शाखांपैकी एक आहे. मानसिक विकार, मानसिक स्थिती हे रोग आहेत. त्यासंबंधी लोकांना कसं समजावून सांगता येईल याचाही विचार या कोर्समध्ये केला जाणार आहे.