23 January 2020

News Flash

हा चंद्र जिवाला लावी पिसे! चांद्रयान २ अवकाशात झेपावले

दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी चांद्रयान २ चंद्राच्या दिशेने झेपावले आहे

चंद्र हा सगळ्यांनाच मोहित करणारा आहे. कवींचा तर तो लाडका मित्र माणसाने चंद्रावर पाऊल ठेवलं त्या गोष्टीलाही आता ५० वर्षे पूर्ण झाली. भारताची चांद्रयान२ मोहीम काही वेळापूर्वीच राबवण्यात आली.  दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी हे प्रक्षेपण करण्यात आले.  श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रावरुन चांद्रयान २ चे प्रक्षेपण करण्यात आले.  हे यान चंद्रावर पोहचण्यासाठी चाळीस दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागणार आहे. हेलियमच्या टाकीतील दबाव कमी झाल्याने १५ जुलै रोजी होणारं हे उड्डाण ५६ मिनिटे आधी रद्द करण्यात आलं होतं. त्यानंतर इस्रोने आज म्हणजेच सोमवारी दुपारी २.४३ मिनिटांची वेळ चांद्रयान२ मोहिमेची वेळ निश्चित केली.

पाहा व्हिडिओ

चंद्रापासून ३० किमी अंतर राहिल्यानंतर चांद्रयान २ चा वेग कमी करण्यात येणार आहे. भारत पहिल्यांदाच सॉफ्ट लँडिंग करणार आहे. हे यान चंद्रावर उतरण्याच्या आधीची १५ मिनिटं महत्त्वाची आहेत असं के. शिवन यांनी म्हटलं आहे. भारत सॉफ्ट लँडिंग करण्यात यशस्वी झाल्यास तो जगातला चौथा देश ठरणार आहे. चांद्रयान २ चंद्राच्या दिशेने झेपावले आहे.

सगळ्याच भारतीयांसाठी अभिमानाची असणारी ही मोहीम आहे. चांद्रयान २ हे इस्त्रोच्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी चांद्रयान २ चं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. प्रक्षेपण झाल्यानंतर सगळ्यांनीच टाळ्या वाजवून आनंद साजरा केला. चांद्रयान २ या यानाचा हा सुरुवातीचा काळ आहे. सुरुवातीला रॉकेटचा वेग नियमित असणार आहे असेही इस्त्रोने सांगितले आहे. चांद्रयान २ चंद्राच्या दिशेने झेपावल्याने इस्रोने पुन्हा एकदा एक नवा इतिहास रचला आहे. चांद्रयान २ ची यात्रा ४५ दिवसांपेक्षा जास्त दिवसांची असणार आहे. सुरुवातीचे २३ दिवस हे यान पृथ्वीच्या कक्षेतच असणार आहे. २५० वैज्ञानिकांची या यानावर नजर असणार आहे.

चांद्रयान २ ची वैशिष्ट्ये काय?

चांद्रयान २ चे वजन ३.८ टन इतके आहे

भविष्यातील अनेक मोहिमांसाठी चांद्रयान २ एक चांगलं उदाहरण ठरणार आहे

या मोहिमेद्वारे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवापर्यंत पोहचणार आहे. या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न अद्याप कुणीही केलेला नाही

 

 

Live Blog

14:29 (IST)22 Jul 2019
३ लाख ८४ हजार किमी अंतर कापणार चांद्रयान २
14:29 (IST)22 Jul 2019
३ लाख ८४ हजार किमी अंतर कापणार चांद्रयान २
14:21 (IST)22 Jul 2019
चांद्रयान २ मोहिमेसाठी उरली अवघी काही मिनिटे

चांद्रयान२ अवकाशाच्या दिशेने झेपावण्यासाठी आता अवघ्या काही मिनिटांचा अवधी उरला आहे. दुपारी २.४३ मिनिटांनी चांद्रयान -२  आकाशाकडे झेपावणार आहे 

First Published on July 22, 2019 2:13 pm

Web Title: chandrayaan 2 launch filling of liquid oxygen in cryogenic stage completed and filling of liquid hydrogen in progress launch at 243pm scj 81
Next Stories
1 खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचे काम पंतप्रधान मोदींच्या विरोधात : ओवेसी
2 इराणने अमेरिकेचे १७ हेर पकडले, काही जणांना देहदंडाची शिक्षा
3 प्रेयसीचा साखरपुडा झाल्याने तुटलं ह्रदय, फेसबुक लाइव्ह करत तरुणाची मंदिरात आत्महत्या
Just Now!
X