News Flash

लडाख सीमेवर चीनचा युद्धसराव; भारतची प्रत्येक हालचालींवर बारीक नजर

चीनने जे -११ आणि जे -१६ या लढाऊ विमानांनसह पूर्व लडाखमधील सीमा भागात युद्धसराव केला होता

चीनने पूर्व लडाखमधील सीमा भागात सैन्याच्या कारवाया वाढवल्या आहेत

जून २०२० मध्ये लडाखच्या गलवान व्हॅलीतील चिनी सैन्यासह झालेल्या संघर्षानंतर सीमेवर अद्याप शांतता नाही.दोन्ही देशांचे सैन्य अजूनही एकमेकांसमोर उभे आहेत. पूर्व लडाखमधील तणाव कमी करण्याचे प्रयत्न सुरु असतानाच चीनकडून कुरापती सुरुच आहे. चीनने पूर्व लडाखमधील सीमा भागात सैन्याच्या कारवाया वाढवल्या आहेत. या भागात चीनने युद्धसराव सुरु केला आहे. तरी, चीनच्या प्रत्येक हालचालीवर भारत बारीक लक्ष ठेवून आहे. सीमेजवळील हवाई कारवायांबरोबरच चीनच्या युद्ध अभ्यावर लक्ष ठेवून आहे असे भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

लढाऊ विमानांसह युद्धसराव

काही दिवसांपूर्वी, चीनच्या हवाई दलाने आपल्या लढाऊ विमानांसह पूर्व लडाखला लागून असलेल्या एलएसीच्या हवाई हद्दीत एक मोठा युद्धसराव केला होता. चिनी हवाई दलाच्या सुमारे दोन डझन लढाऊ विमानांनी या सरावात भाग घेतला होता असे सांगण्यात येत आहे. या लढाऊ विमानांमध्ये जे -११ आणि जे -१६ चा समावेश होता.

कावेबाज चीन! भारतातील करोना संकट पाहता सीमेवर हालचालींना वेग

चीनच्या हवाई दलाने तिबेट आणि झिनजियांग प्रांतातील वेगवेगळ्या एअरबेसमध्ये युद्धअभ्यास केला होता. यामध्ये गर-गुनसा, कासार, होपिंग, डोन्गा-जोंग, लिंझी या ठिकाणांचा समावेश होता. लढाऊ विमानांबरोबरच चिनी हवाई दलाने या या सरावात आपली हवाई-संरक्षण यंत्रणा समाविष्ट केली होती.वृत्त आहे. जेणेकरून दुसर्‍या देशातील लढाऊ विमानांनी त्याच्या हवाई क्षेत्रात प्रवेश केला तर त्यांना कारवाई करता येईल.

चीनने लडाख सीमेवरून ९० टक्के सैनिकांना बोलावले माघारी; थंडीमुळे सैनिकांची प्रकृती खालावली

भारतीय सैन्य हाय अलर्टवर

भारत चीनच्या युद्धसरावार लक्ष ठेवून आहे. भारतीय सैन्यदेखील सातत्याने युद्धसराव करत आहे. “चिनी सैन्य त्यांच्या भागात युद्धसराव करत आहेत. आम्ही आमच्या बाजूनेदेखील युद्धअभ्यास करत आहोत,” असे अधिकाऱ्यांनी सांगितले. चीनने सीमेवर आपले सैन्य आणि युद्धसामग्री आणल्याने तिथून सैनिक पुढे येऊ शकतात. त्यामुळे भारतीय सैन्य हाय अलर्टवर आहे असे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी २८ मे रोजी सांगितले होते.

भारत चीन सीमेवरील परिस्थिती गेल्या वर्षभरापासून बदलेली नाही. लडाखच्या सीमेवर दोन्ही देशांचे ५० ते ६० हजार सैनिक तैनात आहेत. पँगाँग सरोवरच्या परिसरात झालेल्या हल्ल्यानंतर सैनिक हटवण्यात आलेले नाहीत. लडाख तिबेट सीमेवरदेखील सारखीच परिस्थिती आहे. दोन्ही देशांचे हवाई दल तिथे तैनात करण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2021 1:15 pm

Web Title: china military exercises on the ladakh border close look at every movement of the indian army abn 97
टॅग : China,India China
Next Stories
1 Farmers Protest: सहा महिन्यांत ५०० मृत्यू; ट्विट करत राहुल गांधींचा पाठिंबा
2 योगी सरकारच्या निवृत्त मुख्य सचिवांची निवडणूक आयुक्तपदी वर्णी
3 अमेरिकेशी पंगा रशियन हॅकर्सला पडला भारी… अशापद्धतीने अमेरिकेने केली चार लाख डॉलर्सची वसुली
Just Now!
X