चीनच्या वुहानमधून उगम पावलेल्या करोनाने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतलं आहे. यामुळे अनेक जणांना जीव गमवावा लागला आहे. तसेच जगाचं अर्थचक्रही मंदावलं आहे. करोनाच्या पहिल्या लाटेनंतर दुसरी लाट आली आणि त्याचे गंभीर परिणाम दिसून आले. आता करोनाच्या तिसऱ्या लाटेचं भाकीत वर्तवण्यात आलं आहे. या लाटेत सर्वाधिक धोका हा लहान मुलांना असल्याचं सांगण्यात येत आहे. यासाठी भारतातही लहान मुलांवर ‘कोव्हॅक्सिन’ लसीची दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल सुरु करण्यात आली आहे. तर चीननं ३ वर्षांवरील मुलांसाठी ‘करोनाव्हॅक’ लसीला मंजुरी दिली आहे. ३ ते १७ वयोगटातील मुलांवरील क्लिनिकल चाचणी यशस्वी झाल्यानंतर ही मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे ३ वर्षांवरील मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. सिनोव्हॅक कंपनीचे कार्यकारी अधिकारी यीन वेईताँग यांनी ही माहिती दिली आहे. ही लस कधीपासून देण्यात येईल याबाबत अजून स्पष्टता देण्यात आली नाही. चीनने देशात लसीकरणासाठी पाच लशींना मंजुरी दिली आहे.

“करोनाव्हॅक लसीला चीन सरकारनं मंजुरी दिली आहे. मात्र ही लस कधीपासून द्यायची हे मात्र ठरवलेलं नाही. ‘करोनाव्हॅक’ची नुकतील पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील करोना चाचणी पूर्ण केली आहे. या क्लिनिकल ट्रायलमध्ये ३ ते १७ वयोगटातील शेकडो मुलांना लस दिली गेली. त्यात ही लस सुरक्षित असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्याचबरोबर प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे”, यीन वेईताँग यांनी चायना सेंट्रल टेलिविजनला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

टोकियो ऑलिम्पिकदरम्यान खेळाडूंना दिले जाणार १,६०,००० लाख मोफत ‘कंडोम’

जागतिक आरोग्य संघटनेनं १ जूनला चीनची दुसरी करोना लस असलेल्या सिनोव्हॅकला मंजुरी दिली आहे. यापूर्वी सिनोफार्मला मंजुरी देण्यात आली होती. चीन देशातील लोकांच्या लसीकरणासोबत इतर देशांना लस पुरवण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे.

एचआयव्हीग्रस्त महिलेच्या शरीरात करोना विषाणूने ३२ वेळा बदलली रचना

चीनमध्ये गेल्या काही दिवसात करोना लसीकरण मोहीमेचा वेग आणखी वाढवण्यात आला आहे. गेल्या पाच दिवसात १० कोटी लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. त्याचबरोबर या वर्षाखेरीस देशातील ८० टक्के लोकांचं लसीकरण करण्याचं उद्दीष्ट असल्याचं सांगण्यात आलं आहे.