चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांचा अमेरिका दौरा रद्द करण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षीय उमेदवारांनी केली होती पण ती फेटाळण्यात आली आहे. चिनी अध्यक्षांच्या दौऱ्याचा लाभ घेऊन दोन्ही देशातील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगण्यात आले आहे.
व्हाईट हाऊसचे प्रसिद्धी उपमंत्री एरिक शुल्झ यांनी सांगितले की,  पुढील महिन्यात चीनचे अध्यक्ष अमेरिकेत येत आहेत, त्यावेळी उच्चस्तरीय चर्चा होणार आहे. त्यामुळे दोन्ही देशातील मतभेद दूर होतील अशी आशा आहे. त्यामुळे त्यांचा दौरा रद्द करण्याचा ओबामा प्रशासनाचा विचार नाही. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हे चीनला कडक शब्दात काही संदेश देण्याची शक्यता नाकारता येत नाही.
क्षी जिनपिंग यांच्या दौऱ्याच्या तारखा अजून निश्चित झालेल्या नाहीत. अमेरिकी उद्योजक व लोक यांना जे प्रश्न महत्वाचे वाटतात ते त्यांच्यापुढे मांडले जातील. अमेरिकी कंपन्यांना चिनी बाजारपेठेत स्थान मिळावे असाही प्रयत्न आहे.