दीड वर्षांपूर्वी चीनमधून बाहेर पडलेल्या करोना विषाणूने जगभरात हाहाकार माजवला आहे. करोना संसर्गामुळे आतापर्यंत कोट्यावधी लोकांना संसर्ग झाला आहे आणि कोट्यवधी लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पण करोना विषाणूची उत्पत्ति कशी झाली याचे या प्रश्नाचे उत्तर आतापर्यंत जगाला सापडलेले नाही. आता जागतिक आरोग्य संघटनेने करोना विषाणूचे मूळ शोधण्यासाठी चीन आणि वुहानच्या प्रयोगशाळांमध्ये पुन्हा तपासणीचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यावर चीनने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

करोना व्हायरसच्या उत्पत्तीच्या दुसऱ्या टप्प्यातील तपासणीची जागतिक आरोग्य संघटनेची (डब्ल्यूएचओ) योजना चीनने गुरुवारी फेटाळून लावली, ज्यामुळे चीनच्या प्रयोगशाळेत तपासणी करता येणार नाही, असे एका उच्च आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले. डब्ल्यूएचओने या महिन्यात वूहान शहरातील प्रयोगशाळा आणि बाजारपेठेच्या माहितीसह चीनमधील करोना व्हायरसच्या उत्पत्तीचा अभ्यासाच्या दुसरा टप्प्याचा प्रस्ताव दिला होता.

राष्ट्रीय आरोग्य आयोगाचे (एनएचसी) उपमंत्री झेंग येक्सिन म्हणाले, “आम्ही अशी उत्तप्ती शोधणारी योजना स्वीकारणार नाही कारण ती काही बाबींमध्ये विज्ञानाकडे दुर्लक्ष करते.” झेंग म्हणाले की त्यांनी प्रथम आरोग्य संघटनेची योजना वाचली तेव्हा ते चकित झाले कारण या प्रयोगशाळेतील प्रोटोकॉलच्या उल्लंघनामुळे संशोधनादरम्यान विषाणूची पसरला गेल्याचे म्हटले आहे.

“आम्हाला आशा आहे की जागतिक आरोग्य संघटना चीनच्या तज्ञांची मते व सूचनांचा गांभीर्याने आढावा घेईल आणि कोविड -१९ विषाणूच्या उत्पत्तीचा शोध घेणे ही वैज्ञानिक बाब मानली जाईल आणि राजकीय हस्तक्षेपापासून मुक्त होईल, ”असे झेंग म्हणाले. चीन अभ्यासाचे राजकारण करण्यास विरोध करते, असेही ते म्हणाले.

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेद्रोस अदहानम गेब्रेयेसस यांनी गेल्या शुक्रवारी सदस्य देशांच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडला. यापूर्वी एक दिवस आधी, गेब्रीएयसस म्हणाले होते की, सुरुवातीच्या काळात चीनमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झाल्याची माहिती नसल्यामुळे पहिल्या तपासात अडथळे आले होते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वाखालील पथकाने मार्चमध्ये वुहानला भेट दिली होती. आरोग्य संघाच्या सदस्यांनी करोना विषाणूची उत्पत्ती शोधण्यासाठी तेथे चार आठवडे संशोधन केले होते. पण या काळादरम्यान चिनी संशोधक सावलीसारखे त्यांच्यासोबत राहिले. नंतर संयुक्त अहवालात, संघाने इतर काही प्राण्यांद्वारे करोना विषाणू मानवांमध्ये पसरण्याची शक्यता व्यक्त केली होती.