चीनमधील ई-कॉमर्स कंपनी अलिबाबाने आपल्या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. कंपनीमधील एका महिला कर्मचाऱ्याने लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, सध्या जिनान शहरातील पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

“लैंगिक अत्याचारासारख्या घटना सहन केल्या जाणार नाही”

अलिबाबा ग्रुपमध्ये लैंगिक अत्याचारासारख्या घटना सहन केल्या जाणार नाहीत असं कंपनीच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे. आमच्याकडे यासाठी झिरो टॉलरन्स धोरण असल्याचंही ते म्हणाले आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना कामावर सुरक्षित वातावरण देणं आमची जबाबदार असल्याचंही ते म्हणाले आहेत.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Girls sexually assaulted by bakery owner in Nalasopara
नालासोपार्‍यात बेकरीचालकाकडून लहान मुलींवर लैंगिक अत्याचार, आतापर्यंत ४ पीडितांच्या तक्रारी
Pimpri chinchwad, Shocking Murder Unveiled, Drunk female friend Advantage, suicide, murder, suicide turn murder, murder in pimpri, crime in pimpri, police, marathi news, post mortem report
पुणे: मद्यधुंद मैत्रिणीचा गैरफायदा घेऊन ठेवले शारीरिक संबंध; मानलेल्या भावाने केली ‘त्याची’ हत्या
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा

चीनमधील सोशल प्लॅटफॉर्म विबोवर हा मुद्दा गाजत आहे. महिलेने दिलेल्या माहितीनुसार, आपण बिजनेस ट्रीपवर असताना लैंगित अत्याचार करण्यात आले. महिलेने केलेल्या आरोपानुसार, तिच्या बॉसने तिला अलिबाबाच्या मुख्यालयापासून जवळपास ९०० किमी दूप जिनान शहरात जाण्यासाठी भाग पाडलं होतं.

“सकाळी उठली तर अंगावर कपडे नव्हते”

महिलेने केलेल्या आरोपानुसार, “२७ जुलैच्या संध्याकाळी झालेल्या मीटिंगमध्ये तिला किस करण्यात आला होता. त्यानंतर काय झालं हे नेमकं आठवत नव्हतं. सकाळी उठले तेव्हा मी हॉटलेच्या रुममध्ये होते. आपल्या शरीरावर कपडे नव्हते. संध्याकाळी काय झालं याची आपल्याला काहीच कल्पना नाही”. महिलेने सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता संध्याकाळी चारवेळा बॉस रुमममध्ये आल्याचं दिसलं.

दरम्यान पोलीस सध्या याप्रकरणी तपास करत आहेत. तर दुसरीकडे कंपनीने कर्मचाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली आहे.