कोळसा घोटाळ्या प्रकरणी दिल्लीतील विशेष न्यायालयाने पाच जणांना दोषी ठरवले आहे. कोळसा मंत्रालयाचे माजी सचिव एच सी गुप्तांसह विकास मेटल पॉवर लिमिटेड या कंपनीच्या चार जणांचा यात समावेश आहे. पश्चिम बंगालमधील मोयरा आणि मधुजोरमधील कोळसा खाणवाटपप्रकरणातील घोटाळ्यासाठी त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे.

यूपीए सरकारच्या काळात मोयरा आणि मधुजोरमधील कोळसा खाणवाटपात घोटाळा झाल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी दिल्लीतील विशेष न्यायालयात सुनावणी सुरु होती. शुक्रवारी कोर्टाने या प्रकरणात निकाल दिला आहे. कोर्टाने कोळसा मंत्रालयाचे माजी सचिव एच सी गुप्तांसह चार जणांना दोषी ठरवले आहे. यात विकास मेटल प्रायव्हेट लिमिटेड चार अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

फौजदारी कट रचणे, भ्रष्टाचारविरोधी कायदा आणि अन्य कलमांतर्गत त्याला दोषी ठरवण्यात आले आहे. ३ डिसेंबर रोजी दोषींच्या  शिक्षेबाबत युक्तिवाद होणार आहे.