‘कोब्रापोस्ट’ या शोधपत्रकारिता करणाऱ्या समुहाच्या एका स्टिंग ऑपरेशनमुळे भारतातील प्रसारमाध्यमांमधील गैरप्रकार चव्हाट्यावर आले आहेत. जातीयवादी वार्तांकनासाठी देशातील ख्यातनाम १७ वृत्तवाहिन्या व वृत्तपत्र समुहाच्या अधिकाऱ्यांनी तयारी दर्शवली. माध्यमांमधील ‘कॅश फॉर न्यूज’च्या स्टिंग ऑपरेशनमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. इंडिया टीव्ही, डीएनए, दैनिक जागरण, अमर उजाला आणि स्कूपव्हूप अशा दिग्गज कंपन्याचे प्रतिनिधी या स्टिंग ऑपरेशनमध्ये कैद झाले आहेत.

कोब्रापोस्टने ‘ऑपरेशन १३६’ हे स्टिंग ऑपरेशन हाती घेतले होते. सोमवारी कोब्रापोस्टने हे स्टिंग ऑपरेशन प्रसारित केले. यात पत्रकार पुष्प शर्मा यांनी आचार्य अटल या नावाने विविध वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्र समुहातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. अटल यांनी त्यांचा संबंध उज्जैनमधील एका आश्रमाशी असल्याचे सांगितले होते.

Air India Air Transport Services Limited jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती; पाहा नोकरीची माहिती….
Looking for a job Elon Musk is hiring engineers designers and more at artificial intelligence AI company xAI
एलॉन मस्कच्या कंपनीत काम करायचयं? ‘या’ पदांसाठी होणार भरती; कंपनीची ‘ही’ पोस्ट वाचलात का?
Yamaha introduces vibrant new color options across the MT15 V2 Fascino and Ray ZR portfolios Know Features And price
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह यामाहा इंडियाने ‘या’ दुचाकींना केलं उपडेट; पाहा कलर ऑप्शन…
spmcil recruitment 2024 jobs in security printing and minting corporation of India ltd
नोकरीची तयारी : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमधील संधी

‘स्टिंग ऑपरेशनमध्ये १७ कंपन्यांच्या प्रतिनिधींनी ‘मवाळ हिंदुत्वा’चा मुद्दा रेटण्याची तयारी दर्शवली. पैसे घेऊन तशा बातम्या देण्याची ऑफर त्यांनी स्वीकारली. विशेष म्हणजे या व्यवहाराची पावती मात्र दिली जाणार नव्हती. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, अखिलेश यादव, मायावती, भाजपा नेते अरुण जेटली, मनोज सिन्हा, जयंत सिन्हा, मनेका गांधी आणि वरुण गांधी यांची नकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याची तयारीही या मंडळींनी दर्शवली. कोब्रापोस्टच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये अडकलेले सर्व अधिकारी हे कंपनीत मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. त्यामुळे या स्टिंग ऑपरेशनमुळे खळबळ उडाली.

‘दैनिक जागरण’चे मुख्य संपादक संजय गुप्ता यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना हे आरोप फेटाळून लावले. बिहारमधील विभागीय व्यवस्थापक संजय प्रताप सिंह यांच्याकडे इतके अधिकारच नाही, असे त्यांनी सांगितले. त्यांनी कोब्रापोस्टने प्रकाशित केलेल्या व्हिडिओच्या विश्वासार्हतेवर शंका उपस्थित केली. जर व्हिडिओ खरा असेल आणि चौकशीत तथ्य आढळले तर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

‘इंडिया टीव्ही’च्या सेल्स विभागाचे प्रमुख सुदीप्तो चौधरी यांनी देखील प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, व्हिडिओत फेरफार करण्यात आले आहेत. कोब्रापोस्टच्या पत्रकाराने दिलेली कोणतीही ऑफर आमच्या अधिकाऱ्यांनी स्वीकारलेली नाही. आम्ही या प्रकरणात कायदेशीर कारवाई करु, असे त्यांनी सांगितले. तर कोब्रा पोस्टने स्टिंग ऑपरेशनचा दुसरा भाग काही दिवसांमध्ये प्रसारित करु, असे सांगितले आहे. त्यामुळे आता दुसऱ्या भागात आता कोणत्या माध्यम समुहाची पोलखोल होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या कंपन्या अडचणीत
डीएनए, दैनिक जागरण, अमर उजाला, इंडिया टीव्ही, स्कूपव्हूप, प्राईम, पंजाब केसरी, यूएनआय न्यूज, ९ एक्स टशन, समाचार प्लस, आज हिंदी डेली, स्वतंत्र भारत, इंडिया वॉच, एचएनएच २४ बाय ७, रेडिफ डॉटकॉम, सब टीव्ही, हिंदी खबर