News Flash

उत्तरेत थंडीचा कहर वाढण्याची चिन्हे

येत्या काही दिवसांत दिवसाचे कमाल तापमान ८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरू शकते,

ध्रुवीय भोवऱ्याचा परिणाम; मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता

नवी दिल्ली : उत्तर भारतात पंजाबसह अन्य राज्यांत सलग दुसऱ्या आठवडय़ात थंडीची लाट पसरली आहे. या शीत लहरीस ध्रुवीय भोवरा (पोलार व्हर्टेक्स) कारणीभूत असल्याची माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली आहे.

पृथ्वीच्या ध्रुवीय प्रदेशात उंचावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यावर ध्रवीय भोवऱ्याची स्थिती निर्माण होते. येत्या काही दिवसांत तरी ही स्थिती कायम राहण्याची शक्यता असून नव्या वर्षांच्या आरंभकाळात पंजाबमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे थंडीमुळे होणाऱ्या हालअपेष्टांमध्ये आणखी भर पडू शकते.

भारतीय हवामान खात्याच्या चंडीगड कार्यालयाचे संचालक सुरिंदर पॉल यांनी सांगितले की, पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवांभोवती ध्रुवीय भोवऱ्याचे मोठे क्षेत्र तयार झाले आहे. हे क्षेत्र कमी दाबाचे आणि थंड हवेचे आहे. आर्टिक प्रदेशातून येणारे वारे आणि पश्चिमेकडील वातावरणीय घटक या ध्वुवीय भोवऱ्यामुळे दक्षिणेकडे ढकलेले जात आहेत. त्यामुळे विशेषत: हिवाळ्यात ध्रुवीय भोवऱ्यातून थंडीची लाट निर्माण होते. यापूर्वी २०१४ मध्ये याचप्रकारे अनेक दिवस देशात थंडीची लाट पसरली होती.  गुरुवारी चंडीगडमध्ये दिवसाचे कमाल तापमान ९ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. येत्या काही दिवसांत दिवसाचे कमाल तापमान ८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरू शकते, असे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

वेगवान वाऱ्यांची प्रतीक्षा

हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, थंडीची लाट नाहिशी करण्यासाठी संबंधित प्रदेशात प्रतितास १० ते १५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची गरज असते. सध्या त्यापेक्षा मंद गतीने वारे वाहत असल्याने थंडीचा कडाका होण्याची शक्यता सध्या तरी नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2019 2:50 am

Web Title: cold wave grips north india for the second consecutive week zws 70
Next Stories
1 आगामी वर्षात ‘या’ दिवशी बँकांना असणार सुट्टी
2 एसबीआय, पीएनबी, एचडीएफसी,आयसीआयसीआय बँक खातेधारकांनो लक्ष द्या…
3 पाकिस्तानच्या चार सैनिकांचा खात्मा, अनेक चौक्या उद्धवस्त
Just Now!
X