News Flash

सामान्यांच्या खांद्यावरील खर्चाचा भार वाढला; गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महागला, जाणून घ्या नवे दर

तेल कंपन्यांनी केली गॅसच्या दरांमध्ये वाढ

फोटो सौजन्य : पीटीआय

तेल कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या किंमतींमध्ये मोठी वाढ केली आहे. घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या १४.२ किलो वजनाचा गॅस सिलिंडरच्या किंमतीत ५० रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत. तर पाच किलोच्या गॅसच्या किंमती १८ रुपयांनी वाढवल्या आहेत. त्याचप्मराणे १९ किलो सिलिंडरसाठी आता ३६.५० रुपये जास्त मोजावे लागणार आहे. देशातील सर्वात मोठी तेल कंपनी असणाऱ्या आयओसीने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये आता १४.२ किलो वजनाचा गॅस सिलिंडर ६४४ रुपयांना झाला असून कोलकात्याने तो ६७०.५० रुपये तर मुंबईत ६४४ रुपयांपर्यंत पोहचला आहे. चेन्नईमध्ये गॅस सिलिंडरसाठी ६६० रुपये मोजावे लागत आहेत.

आजची दरवाढ होण्याआधी दिल्लीमध्ये १४.२ किलो गॅस सिलिंडरचे दर ५९४ रुपये इतके होते. कोलकात्यामध्ये ६२०.५० रुपये तर मुंबईमध्ये ५९४ रुपयांना गॅस सिलिंडर मिळायचा. मात्र आता यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार असणाऱ्या सर्वासामान्यांच्या खिशाला या दरवाढीची झळ बसणार आहे. १९ किलोच्या सिलिंडरची दिल्लीमधील किंमत एक हजार २९६ रुपये, कोलकात्यामध्ये एक हजार ३५१ रुपये ५० पैसै, मुंबईमध्ये एक हजार २४४ रुपये आणि चेन्नईमध्ये एक हजार ४१० रुपये ५० पैशांपर्यंत गेली आहे. गॅस सिलिंडरवर देण्यात येणाऱ्या सबसिडीअंतर्गत केंद्र सरकार प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी १२ गॅस सिलिंडरवर सूट देते. ग्राहकांना या कालावमध्ये अधिक सिलिंडर लागले तर त्यांना बाजार भावात ते विकत घ्यावे लागतात.

तेल कंपन्या दर महिन्याला गॅस सिलिंडरच्या किंमतीची तपासणी करुन आंतरराष्ट्रीय दर आणि विदेशातील दरांनुसार गॅस सिलिंडरचे दर निश्चित केले जातात. गॅसच्या किंमती जाणून घेण्यासाठी ग्राहकांना https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या लिंकला भेट देता येईल. येथे आपल्या शहराचे नाव सिलेक्ट करुन शहरातील गॅसचे दर जाणून घेता येतील.

राष्ट्रवादीने केली मागणी…

मागील १५ दिवसांमध्ये केंद्रातील भाजपा सरकारने एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतींमध्ये १०० रुपयांनी वाढ केली आहे. मागील एक वर्षामध्ये करोना कालावधीत लोकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झालाय, अर्थव्यवस्था कोलमडली आहे. अशी परिस्थिती असताना मोदी सरकार देशातील सामान्य नागरिकांना स्वस्त दरांमध्ये स्वयंपाकासाठी वापरला जाणार एलपीजी गॅस आणि इंधन उपलब्ध करुन दिलास देणारा निर्णय घेण्याऐवजी अवसंवेदनशीलता दाखवत दरवाढ करत आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. मोदी सरकारने घरगुती वापरच्या गॅस सिलिंडरचे दर तसेच पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये कपात करुन सर्व सामान्यांना दिलासा द्यावा. या इंधन दरवाढीचा राष्ट्रवादी काँग्रेस निषेध करते. तसेच मोदी सरकारने घरगुती गॅस दरांमध्ये तातडीने बदल करावेत अशी मागणीही तपासे यांनी केलीय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2020 11:40 am

Web Title: commercial lpg price hiked by rs 50 here is how much it will cost in delhi mumbai kolkata chennai scsg 91
Next Stories
1 मोदी सरकारसाठी आंदोलनकर्ते शेतकरी खलिस्तानी, तर भांडवलदार हे उत्तम मित्र – राहुल गांधी
2 भाजपाच्या माजी आमदाराला तीन वर्षांचा तुरुंगवास
3 भारतात फेसबुकवर भाजपा-आरएसएसचं नियंत्रण ,‘त्या’ रिपोर्टनंतर राहुल गांधींचा मोठा आरोप
Just Now!
X