करोनावरील लस देण्याची  संभाव्य प्रक्रिया व नियमांबाबत चर्चा करण्यासाठी नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञ समितीची बैठक बुधवारी होणार आहे. त्यात कोविड १९ लस उत्पादन, पुरवठा व्यवस्था व इतर नैतिक बाबींवरही उहापोह करण्यात येईल.  लस देण्याच्या वेळी कुणाला अग्रक्रम द्यायचा, लशीचा पुरवठा कसा असेल अशा अनेक बाबींवर ही समिती विचार करणार आहे. राज्ये, लस उत्पादककंपन्या यांच्याशीही समिती चर्चा करणार आहे. लसनिर्मितीनंतर ती कुणाला आधी द्यायची, शीतेपटय़ांची व्यवस्था कशी करायची, लस टोचणाऱ्यांना प्रशिक्षण कसे द्यायचे याचा विचार आधीच करण्याचे समितीने ठरवले आहे.