News Flash

संविधान दिन : सोनिया गांधींकडून संसदेच्या आवारात राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे वाचन

महाराष्ट्रातील भाजपा सरकारविरोधात विरोधी पक्षांकडून निदर्शनं

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज संसदेच्या आवारातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. तसेच, भाजपकडून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या मदतीने महाराष्ट्रात स्थापन करण्यात आलेल्या सरकाराच्या विरोधात यावेळी विरोधी पक्षांकडून निदर्शने देखील करण्यात आली.

राज्यातील सत्तास्थापनेवरुन झालेल्या संघर्षानंतर शिवसेना आणि भाजपामधील संबंध ताणले गेले आहेत. सध्या महाराष्ट्रात दर दिवशी नाट्यमय घडामोडी घडत असून याचा परिणाम दिल्लीतही जाणवत आहे. एनडीएमधून बाहेर पडलेल्या शिवसेनेने संविधान दिनाच्या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर काँग्रेसच्या नेतृत्वात काही विरोधी पक्षदेखील संविधान दिनानिमित्त आयोजित संसदेतील संयुक्त बैठकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

आणखा वाचा- संविधान आमच्यासाठी सर्वात मोठा ग्रंथ आहे : पंतप्रधान

विशेष म्हणजे सोमवारी रात्री शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, गजानन कीर्तीकर, अनिल देसाई आणि राहुल शेवाळे यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली होती. राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते पहिल्यांदाच सोनिया गांधींना भेटले होते. यावेळी काँग्रेसच्या विरोध प्रदर्शनास पाठिंबा देणार असल्याचे शिवसेनेच्या खासदारांनी सोनिया गांधी यांना सांगितले असल्याचे बोलले जात आहे.काँग्रेसचे नेते केसी वेणुगोपाल यांनी ही भेट आयोजित केली असल्याची माहिती आहे.

आणखा वाचा- संविधान दिन: संसदेतील कार्यक्रमावर शिवसेना टाकणार बहिष्कार

२६ नोव्हेंबर हा भारतीय संविधान दिन म्हणून भारत सरकारकडून देशभर साजरा केला जातो. यानिमित्त संविधान गौरवाचे कार्यक्रम, संविधान गौरव सप्ताहाचे आयोजन केले जाते. यंदा २६ नोव्हेंबर ते १४ एप्रिलपर्यंत भारत सरकारतर्फे संविधान गौरव अभियान साजरे केले जाणार आहे. संविधान दिनानिमित्त आज संसदेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती वैकंय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी खासदारांना संबोधित करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2019 12:12 pm

Web Title: congress interim president sonia gandhi reads a copy of indian constitution msr 87
Next Stories
1 संविधान आमच्यासाठी सर्वात मोठा ग्रंथ आहे – पंतप्रधान
2 संविधान दिन: संसदेतील कार्यक्रमावर शिवसेना टाकणार बहिष्कार
3 सत्तापेचावर आज निकाल
Just Now!
X