लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक प्रफुल पटेल यांच्या कारभारावरुन सध्या त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पटेल यांनी घेतलेल्या निर्णयांना विरोध दर्शवला आहे. आता काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी लक्षद्वीपसाठी तयार करण्यात आलेल्या नव्या नियमावलीचा विरोध करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारवर समुद्रातील आभूषण नष्ट करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच लक्षद्वीपमधील नागरिकांसोबत असल्याचं त्यांनी ट्वीटमध्ये सांगितलं आहे.

” लक्षद्वीप समुद्रातील भारताचं आभुषण आहे. सत्तेत असलेल्या अज्ञानी कट्टरपंथी हे नष्ट करू पाहात आहेत. मी लक्षद्वीपच्या जनतेसोबत उभा आहे”, असं ट्वीट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं आहे.

केंद्र शासित प्रदेश असणाऱ्या लक्षद्वीप येथे पाच महिन्यापूर्वी पटेल यांची नियुक्ती करण्यात आली होती. लक्षद्वीपमध्ये ९० टक्के जनता ही मुस्लिम आहे. दोनपेक्षा अधिक मुले असणाऱ्यांना ग्रामपंचायत निवडणुकीत अपात्र ठरवण्याचा आणि गोमांसावर बंदी घालण्याची प्रस्ताव मांडल्याने केंद्रशासित प्रदेशात खळबळ उडाली आहे. विरोधकांनी देखील लक्षद्वीपचा दुसरा काश्मीर तयार करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

“योगगुरु रामदेव यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करा”; आयएमएचं पंतप्रधान मोदींना पत्र

मसुद्यानुसार कोणतीही व्यक्ती लक्षद्वीपमध्ये कोठेही कुठल्याही स्वरुपात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे गोमांस किंवा गोमांस उत्पादनांची खरेदी,विक्री, साठवण, वाहतूक करु शकणार नाही. या नियमांचे उल्लंघन केल्यास दोषींना १० ते ७ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा आणि ५ ते १ लाखांपर्यंत दंडाची शिक्षा केली जाऊ शकते.

“उद्या पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास राज्यांनी हत्यारं विकत घ्यायची का?’; लसींवरून केजरीवाल यांचा केंद्र सरकारवर निशाणा

दरम्यान, करोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान वाढलेल्या रुग्णसंख्येसाठी पटेल यांना जबाबदार ठरवण्यात येत आहे. पहिल्या लाटेदरम्यान बेटावर एकाही करोना रुग्णाची नोंद झाली नव्हती. आता बेटांवर प्रवेश करणाऱ्यांना आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.