काँग्रेसच्या ८४ व्या महाअधिवेशनाला पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या भाषणाने दिल्लीत सुरुवात झाली. सध्या समाजात तेढ निर्माण केले जात आहे. देशाला जोडण्याची ताकद तरुणांमध्ये असून काँग्रेसशिवाय देशाला पर्याय नाही, असे राहुल गांधी यावेळी म्हणाले. पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा खांद्यावर घेतल्यानंतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखील पहिल्यांदाच हे महाअधिवेशन होत असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, पुढील पाच वर्षांसाठी काँग्रेसची धोरणं आणि दिशाही यावेळी निश्चित केली जाणार आहे. दरम्यान, चार महत्वपूर्ण प्रस्ताव यावेळी पारित केले जाणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 17th Mar 2018 रोजी प्रकाशित
काँग्रेसच देशाला दिशा देऊ शकते; काँग्रेस महाअधिवेशनात राहुल गांधींचा दावा
राहुल गांधीच्या भाषणाने होणार महाअधिवेशनाला सुरुवात
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 17-03-2018 at 08:31 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress plenary session begins today the partys next five year direction will be decided