News Flash

राज्यघटनेत अल्पसंख्याक शब्दाची व्याख्या नाही

राज्यघटनेत काही कलमांमध्ये अल्पसंख्याक शब्दाचा वापर केला गेला असला तरी या शब्दाची नेमकी व्याख्या केलेली नाही,

| August 13, 2013 01:13 am

राज्यघटनेत काही कलमांमध्ये अल्पसंख्याक शब्दाचा वापर केला गेला असला तरी या शब्दाची नेमकी व्याख्या केलेली नाही, अशी कबुली अल्पसंख्याक व्यवहारविषयक राज्यमंत्री निनाँग एरिंग यांनी सोमवारी राज्यसभेत प्रश्नोत्तरांच्या तासात दिली. घटनेच्या कलम २९ आणि ३० तसेच ३५० अ आणि ३५० ब मध्ये अल्पसंख्याक शब्द अनेक छटांसह आला आहे, असे त्यांनी नमूद केले.  कलम २९ मध्ये दुर्मीळ भाषा बोलणारे वा लिपी लिहिणारे समाजगट, असा शब्द अल्पसंख्याक म्हणून येतो. प्रत्यक्षात बहुसंख्याक समाजातही असा गट असू शकतो, असे उत्तरात नमूद आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 13, 2013 1:13 am

Web Title: constitution does not define the word minorities
टॅग : Minorities
Next Stories
1 लोकसभेत गोंधळात गोंधळ; कामकाज दिवसभरासाठी तहकूब
2 किश्तवारमधील हिंसाचाराच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश
3 ‘पृथ्वी-२’ क्षेपणास्त्राची पुन्हा यशस्वी चाचणी
Just Now!
X