18 January 2021

News Flash

भारतात करोना लसीकरणाची तारीख ठरली, केंद्र सरकारकडून महत्त्वाची घोषणा

कोव्हिशिल्ड आणि स्वदेशी कोव्हॅक्सिन या दोन करोना प्रतिबंधक लसींना मान्यता....

सध्या देशात सर्वांचेच लक्ष लसीकरणाच्या कार्यक्रमाकडे लागले आहे. लसीकरण हाच करोना व्हायरसचा फैलाव रोखण्याचा एकमेव मार्ग आहे. या व्हायरसमुळे जगभरात आतापर्यंत कोटयवधी लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. लॉकडाउन हा या आजाराचा फैलाव रोखण्याचा एक मार्ग आहे. भारतात या लॉकडाउनमुळे आतापर्यंत मोठे नुकसान झाले आहे. जिवीतहानी बरोबर आर्थिक हानी देखील मोठी झाली आहे. कोटयवधी लोकांचे रोजगार बुडाले. त्यामुळे सर्वांचेच लक्ष लसीकरणाकडे लागलेले असताना सरकारने एक महत्त्वाची घोषणा केली आहे.

सरकारने कोव्हिशिल्ड आणि स्वदेशी कोव्हॅक्सिन या दोन करोना प्रतिबंधक लसींना आपत्कालीन मर्यादीत वापर करण्यास मान्यता दिली आहे. केंद्र सरकारने आज याबाबत महत्त्वाची घोषणा केली. देशात येत्या १६ जानेवारीपासून करोना प्रतिबंधक लसीकरणास सुरुवात होणार आहे.

लसीकरणात आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी आणि करोना योद्धयांना पहिले प्राधान्य दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात तीन कोटी नागरिकांच्या लसीकरणाची योजना आहे. त्यानंतर ५० वर्षावरील व्यक्ती आणि को-मोर्बिडीटी असणारे ५० पेक्षा कमी वयाच्या लोकांना लसीचे डोस दिले जातील.

“आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी आणि करोना योद्धयांना लसीकरणात पहिले प्राधान्य असेल. त्यांची संख्या तीन कोटीच्या घरात असण्याचा अंदाज आहे. त्यानंतर ५० वर्षावरील व्यक्ती आणि को-मोर्बिडीटी असणारे ५० पेक्षा कमी वयाचे लोक. या सर्वांची मिळून संख्या २७ कोटीच्या घरात असण्याचा अंदाज आहे” असे केंद्राने म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पार पाडली. त्यात देशातील करोनाची सद्य स्थिती तसेच लसीकरणासाठी केंद्रशासित प्रदेश व राज्यांनी केलेल्या तयारीचा आढावा घेतला. प्रधान सचिव, कॅबिनेट सचिव, आरोग्य सचिव आणि अन्य वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. मुख्य लसीकरणाला सुरुवात होण्याआधी देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचा ड्राय रन पार पडला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2021 5:00 pm

Web Title: corona virus prevention vaccination drive to begin from january 16 in india dmp 82
Next Stories
1 लडाखच्या चुशूल सेक्टरमध्ये भारतीय लष्कराने चीनच्या सैनिकाला पकडलं
2 दोन नाही, तीन मनांचे मिलन, एकाच मांडवात त्याने दोघींसोबत केले लग्न
3 प्रश्नार्थक नजरांना भारतीयांनी प्रत्येकवेळी चुकीचं ठरवलं -पंतप्रधान मोदी
Just Now!
X