करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करण्यासाठी सर्वसामान्यांबरोबर देशभरातील उद्योगपती आपल्यापरीने मदतीचा हात पुढे करत आहेत. टाटा ग्रुपने १५०० कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केल्यानंतर आता मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने मदत जाहीर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपातकालीन परिस्थितीसाठी असलेल्या पंतप्रधान नागरीक सहाय्यता निधीला म्हणजे पीएम केअर्स फंडाला रिलायन्स इंडस्ट्रीजने ५०० कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. टाटा समूहाने शनिवारी आजवरची सर्वात मोठी आर्थिक मदत जाहीर केली होती.

आर्थिक मदतीशिवाय रिलायन्सने खास करोनाग्रस्त रुग्णांसाठी १०० बेडची क्षमता अससेले रुग्णालयही उभे केले आहे. सध्याच्या परिस्थिती या आजाराला रोखण्यासाठी मास्क अत्यावश्य असल्याने रिलायन्सचे दिवसला १ हजार मास्कची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. रिलायन्स फाऊंडेशनने सेव्हन हिल्स रुग्णालयात खास करोना व्हायरसच्या रुग्णांसाठी १०० बेडसचा विभाग सुरु केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus crisis reliance industries announces rs 500 crores contribution to pm cares fund dmp
First published on: 30-03-2020 at 20:04 IST