24 October 2020

News Flash

लग्नासाठी वरात निघाली खरी, पण नवरामुलगाच निघाला करोना पॉझिटिव्ह

नवरदेव करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर पोलिसांनी थांबवला विवाह

संग्रहित छायाचित्र

लग्नासाठी वरात घेऊन निघालेल्या नवरामुलालाच करोनाची लागण झाल्याची घटना समोर आली आहे. नवरामुलगा आणि त्याच्या वडिलांना करोनाची लागण झाल्याने लग्नच रद्द करावं लागलं. उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यात ही घटना घडली आहे. लग्नासाठी वाजत गाजत वरातही निघाली होती. पण नवऱ्यामुलाला करोनाची लागण झाल्याचं कळताच वरात आली त्याच मार्गाने पुन्हा परत पाठवण्यात आली.

१५ जून रोजी नवऱ्यामुलाचं कुटुंब लग्नासाठी दिल्लीहून अमेठी येथं आलं होतं. यावेळी त्यांची करोना चाचणी घेऊन नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. १९ जून रोजी नवरामुलगा आणि त्याचं कुटुंब लग्नासाठी जात असतानाच त्यांचा रिपोर्ट आला. यावेळी नवरामुलगा आणि त्याच्या वडिलांना करोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं. तात्काळ पोलिसांना यासंबंधी माहिती देण्यात आली. यानंतर वरात थांबवण्यात आली. नवरामुलगा आणि त्याच्या वडिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून कुटुंबातील सदस्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2020 6:02 pm

Web Title: coronavirus lockdown groom and father test positive in uttar pradesh sgy 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 चर्चेमध्ये चीनने कमांडिंग ऑफिसर ठार झाल्याचं केलं मान्य
2 शंकरसिंह वाघेला यांची राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी
3 जगन्नाथ रथयात्रेला परवानगी, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Just Now!
X